वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्सवी काळासाठी नोकिया कंपनीने आपला नवा परवडणारा जी 11 प्लस स्मार्टफोन लाँच केला आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 12 हजार 499 रुपये इतकी असणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
या 4 जी मोबाइलमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस स्क्रीन दिला जाणार असून 50 मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा यासोबत मिळणार आहे. 5 हजार एमएएचची बॅटरी असण्यासोबत तीन दिवसांपर्यंत ही बॅटरी बॅकप देईल, असा दावा कंपनीचा आहे.
या फोनमध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल स्टोरेजची सोय असून मेमरी कार्डच्या माध्यमातून 512 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येतो. 10 वॅट युएसबी टाइप सी फास्ट चार्जर यासोबत मिळणार आहे. जी 11 प्लस 3 जीबी रॅम व 32 जीबी व 64 जीबी स्टोरेजचा फोन मात्र भारतात लाँच करण्यात आलेला नाही.
याचवर्षी नोकियाने जी 11 प्लसचे जागतिक स्तरावर जूनमध्ये लाँचिंग केले होते. नोकियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ग्राहकांना हा नवा फोन खरेदी करता येऊ शकतो. त्यांच्या विक्री केंद्रावर व ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरही लवकरच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
महत्त्वाची वैशिष्टय़े
जी 11 प्लस
w
6.5 इंचाचा डिस्प्ले व अँड्रॉइड
12 ऑपरेटिंग सिस्टम
w
50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा,
8 मे.पि. सेल्फी कॅमेरा
w
3.5 एमएमचा हेडफोन जॅक, वायफाय, 4 जी कनेक्टिव्हीटीसह
ब्लू टुथ व एफएम रेडियो
wब्लू, चारकोल ग्रे रंगात येणार
wरियर माऊंटेड फिंगर प्रिंट सेन्सर