50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार
नवी दिल्ली
नोकियाने आपला नवीन स्मार्टफोन जी 60 हा 5जी नेटवर्कसोबत सादर केला आहे. सदरच्या मॉडेलची किमत ही भारतात 29,999 रुपये असणार आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. याशिवाय, यात 6.58 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय यात 8-मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरादेखील आहे.
अत्याधुनिक सुविधा
फोन ब्लॅक व आइस रंगामध्ये सादर
फोन 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह येणार
4500 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ब्लूटूथ 5.1, एक 3.5 मिमी जॅक, एक टाइप-सी पोर्ट आणि डय़ुअल-बँड वाय-फायचा समावेश राहणार