Tarun Bharat

नोकियाचा ‘टी 10 टॅबलेट’ लॉन्च

8-इंचाची एचडी क्रीन, किंमत 11,799 रुपये

नवी दिल्ली

  नोकियाकडून भारतात आपला नवीन टी 10 टॅबलेट सादर करण्यात आला आहे.  3जीबी आणि 4 जीबी रॅम प्रकारांमध्ये उपलब्ध, टॅबलेटची सुरुवातीची किंमत 11,799 रुपये आहे. अपडेटेड सॉफ्टवेअरवर आधारित अँड्रॉईड 12 ऑपरेटिंग सिस्टम आहे. कंपनीचा दावा आहे की टॅबची 8-इंच क्रीन नेटफ्लिक्स एचडी प्रमाणित आहे.

8 इंच एचडी क्रीन असलेल्या टॅबलेटला 8 एमपी रियर आणि 2 एमपी प्रंट कॅमेरादेखील मिळेल. सोबत 10 टाइप-सी चार्जर येईल. कंपनीने 5250  एमएएचच्या दीर्घकाळ टिकणाऱया बॅटरीसह संपूर्ण दिवस कामगिरीचा दावा केला आहे. या टॅबलेटच्या वाय-फाय व्हेरिएंटमध्ये नॅनो सिम टाकता येईल. स्टिरीओ स्पीकर, बायोमेट्रिक फेस अनलॉक सिस्टीम ही त्याची प्रमुख वैशिष्टय़े आहेत.

 एलटीइ आवृत्ती लवकरच होणार सादर 

नोकिया टॅब फोन कॉल आणि एसएमएस सेवा प्रदान करत नाही. तथापि, कंपनी लवकरच टी 10 ची एलटीइ आवृत्ती भारतात लॉन्च  करणार असल्याचीही माहिती आहे.

Related Stories

जिओ दूरसंचार क्षेत्रात देशात चमकणार

Patil_p

विमा क्षेत्रात आता युपीआयसारखी सेवा होणार सुरु

Patil_p

शेअर बाजार विक्रमी स्तरावर, सेन्सेक्स 48 हजारावर

Patil_p

एलॉन मस्क यांच्या संपत्तीत 45 टक्क्यांनी घसरण

Patil_p

11 वर्षामध्ये ब्रिटन प्रथमच आर्थिक मंदीमध्ये

Patil_p

‘दालमिया भारतकडून’ पॅकिंगमधील साखरेचे सादरीकरण

Patil_p