Tarun Bharat

जपानच्या दिशेने उत्तर कोरियाने डागले क्षेपणास्त्र

Advertisements

10 दिवसात 5 वे क्षेपणास्त्र परीक्षण ः 5 वर्षांनी जपानच्या क्षेत्रातून झेपावले कोरियन क्षेपणास्त्र

वृत्तसंस्था / प्योंगयांग

उत्तर कोरियाने मंगळवारी जपानच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली आहे. उत्तर कोरियाने स्वतःच्या पूर्व किनाऱयावरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. एक आटवडय़ात उत्तर कोरियाचे हे पाचवे क्षेपणास्त्र परीक्षण हेते. 2017 नंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले आहे.

हे क्षेपणास्त्र जपानच्या मुख्य भूमीपासून सुमारे 3 हजार किलोमीटर अंतरावर प्रशांत महासागरात कोसळले. उत्तर कोरियाच्या या आगळिकीनंतर जपानमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर जपान सरकारने सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना केली. उत्तर कोरियाच्या आगळिकीला हिंसक वर्तन ठरवत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी या घटनेची कठोर शब्दांत निंदा केली आहे.

जपानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. जपान सरकारकडून होक्काइडो बेटावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक रेल्वेगाडय़ांचे संचालन रोखण्यात आले आहे. उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक आणि आण्विक अस्त्रांच्या परीक्षणावर संयुक्त राष्ट्रसंघानेच बंदी घातली आहे.

उत्तर कोरियाने वेगाने स्वतःच्या सैन्य संचरनेत वाढ करत आहे. मागील काही काळात उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले असून यात एक नव्या प्रकारचे दीर्घ पल्ल्याचे क्रूज क्षेपणास्त्र आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र सामील आहे.  उत्तर कोरियाने अलिकडेच स्वतःला अण्वस्त्रसज्ज देश घोषित केले होते. याकरता उत्तर कोरियाने नवा कायदा संमत केला होता. या कायद्यानुसार उत्तर कोरियाला धोका निर्माण झाल्यास कुठल्याही देशाला आण्विक हल्ला करण्याची मुभा देणारी तरतूद आहे.

Related Stories

युरो चलन वापरणाऱ्या देशांमध्ये महागाई 9.1% वर

Abhijeet Khandekar

प्रदूषणामुळे वर्षात 90 लाख जणांचा मृत्यू

Patil_p

अमेरिकेच्या संसद भवनाबाहेर हल्ला, पोलिसासह हल्लेखोराचा मृत्यू

datta jadhav

चक्रीवादळामुळे क्यूबा ‘अंधारा’त बुडाला

Patil_p

पाकिस्तानचे पंतप्रधान लंडन दौऱ्यावर

Patil_p

पुतिन यांच्या युक्रेन मोहिमेच्या प्रमुखाची आत्महत्या

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!