अमेरिकेचा आरोप : मध्यपूर्व अन् उत्तर आफ्रिकेच्या मार्गाने पुरवठा
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
रशियाला उत्तर कोरिया गुप्तपणे शस्त्रास्त्रs पुरवत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात उत्तर कोरिया आता रशियाला मदत करत आहे. मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेच्या मार्गाने ही शस्त्रास्त्रs रशियात पोहोचविली जात आहेत.
उत्तर कोरियाकडून गुप्त स्वरुपात ही शस्त्रास्त्रs रशियात पोहोचविली जात आहेत. सध्या ही शस्त्रास्त्रs रशियात पोहोचली आहेत की नाही याच पुष्टी झालेली नाही. आम्ही याप्रकरणी चौकशी करत आहोत असे अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले आहे.
इराणकडून ड्रोनपुरवठा
इराण ड्रोन आणि क्षेपणास्त्रs रशियाला पुरवत आहे. युद्धाच्या 8 महिन्यांनी रशियाने युक्रेनवर इराणकडून प्राप्त ड्रोनच्या मदतीने हल्ले सुरू केले आहेत. इराणी सैनिकांना रशियन सैन्याच्या मदतीसाठी क्रीमियात पाठविण्यात आले आहे. इराणचे सैनिक रशियन सैनिकांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देत आहेत असा दावा पेंटागॉनकडून करण्यात आला. युद्धात रशिया आता युक्रेनवर इराणच्या कामीकाजे ड्रोनने हल्ले करत आहे. अमेरिकेच्या सैनिकांवरही या ड्रोनने हल्ले झाले आहेत. इराणचे समर्थन प्राप्त सशस्त्र गटांनी चालू वर्षात इराकमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर केला होता.
पाकिस्तानवर रशियाचा आरोप
अण्वस्त्रनिर्मितीसाठी पाकिस्तान युक्रेनला मदत करत असल्याचा दावा रशियाचे खासदार इगोर मोरोजोव्ह यांनी केला आहे. युक्रेनच्या सैन्याला पाकिस्तानकडून तोफगोळय़ांचा पुरवठा करण्यात येत आहे. अण्वस्त्रनिर्मितीचे ज्ञान बाळगणाऱया युक्रेनच्या वैज्ञानिकांनी पाकिस्तानचा दौरा केल्याचा दावा इगोर यांनी केला आहे.