सेऊल
उत्तर कोरियाने शनिवारी आणखी तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. राजधानी प्योंगयांगच्या दक्षिणेला असलेल्या एका तळावरून याची चाचणी घेण्यात आल्याचे दक्षिण कोरियाने स्पष्ट केले आहे. तसेच कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱयावर दोन संशयित क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याचे जपानने सांगितले. गेल्या आठवडय़ातही उत्तर कोरियाने कमी पल्ल्याच्या दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. या वर्षात उत्तर कोरियाकडून 37 क्षेपणास्त्र चाचण्या झाल्या आहेत. वाढत्या चाचण्यांमुळे उत्तर आणि दक्षिण कोरिया या देशांमधील तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.