Tarun Bharat

नॉर्वेचा रुड उपांत्य फेरीत

Advertisements

मॉन्ट्रियल / वृत्तसंस्था

एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या कॅनेडियन खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रुडने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना कॅनडाच्या फेलिक्स ऍलिसिमेचा पराभव केला. त्याचप्रमाणे हुरकेझने ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसचे आव्हान संपुष्टात आणत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.

शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात नॉर्वेच्या रुडने फेलिक्स ऍलिसिमेचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये 74 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. 2022 टेनिस हंगामात रुडने तिसऱया एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात हुबर्ट हुरकेझने ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसचा 7-6 (7-4), 6-7 (5-7), 6-1 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.

Related Stories

द.आफ्रिका संघ जानेवारीत पाक दौऱयावर

Omkar B

संधी गमावली. बायर्न म्युनिचचा विजय

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 17 धावांनी विजय

Patil_p

मध्य प्रदेश संघाची वाटचाल विजयाकडे

Patil_p

यंदाची प्रो कबड्डी लीग स्पर्धा रद्द

Patil_p

महिलांच्या तिरंगी मालिकेसाठी ईसीबी प्रयत्नशील

Patil_p
error: Content is protected !!