घरात पाळले आहेत 85 प्राणी
प्राणी हे माणसांचे चांगले मित्र होतात. पाळीव प्राण्यांसोबत राहणारा माणूस नैराश्यापासून वाचतो हे अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारणपणे लोक एक किंवा दोन प्राणी पाळतात. काही लोक श्वानांना अनेक संख्येत पाळत असतात. परंतु एका महिलेने स्वतःच्या घराला मिनी प्राणिसंग्रहालयच करून टाकले आहे. जोए विल्लिंघम नावाच्या या महिलेने स्वतःच्या घरात 85 प्राण्यांना आसरा दिला आहे.
एकेकाळी तिच्या घरात 100 हून अधिक प्राणी होत. परंतु आता ही संख्या 85 वर आली आहे. या महिलेचा पूर्ण दिवस या प्राण्यांच्या सेवेत संपून जातो. तिच्या प्राण्यांच्या यादीत मांजर, श्वान, डुक्कर, सशापासून कासव अन् पोपट देखील आहे. ती स्वतःच्या सर्व प्राण्यांवर खूप प्रेम करते.
ऍनिमल पर्सन
ब्रिटनच्या सफॉल्क येथे राहणारी जोए नेहमीच ऍनिमल पर्सन राहिली आहे. प्राण्यांची आई किंवा त्यांच्या पिल्लांची आजी होण्यास तिला मोठा आनंद प्राप्त होतो. विविध घटनांमध्ये वाचविण्यात आलेल्या प्राण्यांना जोएने स्वतःच्या घरात स्थान दिले आहे. जोए सर्व प्राण्यांची मोठी काळजी घेते. त्यांच्या खाण्यापिण्यापासून स्वच्छतेची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या शिरावर घेतली आहे. परंतु या साफ-सफाईवेळी त्या प्रचंड थकून जातात. श्वानांच्या सर्व गरजा पूर्ण करेपर्यंत रात्रीचे दोन वाजत असल्याचे त्यांचे सांगणे आहे. या कामात त्यांचे पती जोए यांना पूर्ण मदत करतात. जोए यांनी कधीकाळी वेट नर्स म्हणून काम केले होते. या अनुभवाचा उपयोग त्यांना घरातील प्राण्यांबाबत होत आहे. जोए स्वतःच या प्राण्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देत आहेत.