Tarun Bharat

मिका सिंगच्या हणजुणेतील बेकायदा बांधकामाला नोटिस

Advertisements

प्रतिनिधी / म्हापसा

प्रसिद्ध गायक मिका सिंग उर्फ अमरिक सिंग याच्याकडून हणजूणच्या किनारी भागात सीआरझेड (किनारी नियंत्रण विभाग) नियमांचे उल्लंघन करत रहिवासी प्रकल्प तसेच संरक्षक भिंतीचे अवैध बांधकाम सुरू आहे. हणजूण पंचायतीने त्याला नोटीस बजावून वरील काम त्वरित बंद करावे, असा आदेश दिला आहे.

 याप्रकरणी माहिती हक्क कार्यकर्ते रवी हरमलकर, गेम्बिनो ड्रेगो यांनी बुधवारी राज्य नगर नियोजन प्राधिकरणाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील सेंट मायकल वाडो, सर्वे क्र. 603/1 येथे मिका सिंग याने घर तसेच संरक्षण भिंतीचे बांधकाम करताना गोवा पंचायत राज कायद्याचा भंग केला आहे. सीआरझेड नियमांचेही उल्लंघन केले आहे. याबाबत हणजूण-कायसूव पंचायत कार्यालयात 15 मे रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत वादग्रस्त बांधकामाची पंचायत मंडळाकडून पाहणी करण्यात आली होती. आता त्याला नोटिस बजावण्यात आली आहे.

तक्रार प्राप्त होताच पंचायत मंडळाकडून वादग्रस्त बांधकामाची पाहणी केली होती. त्याचबरोबर ते बांधकाम तत्काळ बंद ठेवण्याचा आदेशही संबंधितांना दिला होता. मात्र प्रत्यक्षात कारवाई झालेली नाही, असे हणजूण-कायसूव पंचायतीचे सरपंच सावियो आल्मेदा म्हणाले.

Related Stories

राष्ट्रीय दुखवटा…

Patil_p

गोव्याच्या भवितव्याचा आज फैसला

Amit Kulkarni

काणकोण मतदारसंघात भाजपाची उमेदवारी आपल्यालाच

Amit Kulkarni

मातृछाया बालकल्याण आश्रमाचा वार्षिकोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

शिखा पांडे, संजुला नाईकची सीनियर महिला चॅलेजर्स स्पर्धेसाठी निवड

Patil_p

हेडलॅण्ड सडय़ावर भटक्या गुरांचा संशयास्पदरीत्या मृत्यू, एकाला वाचवण्यासाठी लोकांची धावपळ

tarunbharat
error: Content is protected !!