15 दिवसांत थकबाकी न भरल्यास कनेक्शन तोडणार, वीज खात्याचा इशारा
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांविरोधात वाळपई विद्युत खात्यातर्फे कडक मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 400 जणांना नोटिसा पाठविल्या असून मोठय़ा प्रमाणात थकबाकी वसुली होत असल्याची माहिती खात्याच्या सूत्राकडून उपलब्ध झालेली आहे. नोटिसा पाठवूनही अजून पर्यंत थकबाकी भरलेली नाही त्यांची विद्युत कनेक्शन येणाऱया काळात तोडली जाण्याची शक्मयता अधिकाऱयांनी व्यक्त केलेली आहे.
सत्तरी तालुक्मयात प्रचंड प्रमाणात थकबाकी राहिलेली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी खात्याने सर्वत्र थकबाकी वसुली मोहीम हाती घेतलेली आहे. सत्तरी तालुक्मयात ही मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत जवळपास 400 पेक्षा जास्त जणांना नोटिसा पाठविलेला आहेत. थकबाकीची वसुली पाच हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना नोटिसा पाठविलेल्या आहेत. पंधरा दिवसांची मुदत थकबाकी भरण्यासाठी दिलेली आहे.
थकबाकी हफ्त्यात भरण्याची सवलत : दीपक गावस
सत्तरी तालुक्मयात थकबाकी वसुली करण्यासाठी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या निर्देशानुसार मोहीम हाती घेतलेली आहे. काही जणांची थकबाकी एक वर्षापासून थकलेली आहे. ज्यांना एकाच वेळी सदर रक्कम भरणे शक्मय नाही त्यांना हफ्त्यात ही रक्कम भरण्याची सवलत दिलेली आहे. मात्र थकबाकी कोणत्याही परिस्थितीत चुकणार नाही असे यावेळी वाळपई सहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी सांगितले.
थकबाकी न भरल्यास कनेक्शन तोडणार
ही थकबाकी मोहीम आणखी काही महिने चालणार आहे. सध्या पाच हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना नोटिसा पाठविलेल्या आहेत. त्यानंतर पाच हजाराच्या खालील थकबाकीदारानाही नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान ज्यांनी अजून पर्यंत या नोटिसीना प्रतिसाद दिलेला नाही त्यांची कनेक्शन येणाऱया अवघ्याच दिवसांमध्ये तोडण्यात येणार आहे. ग्राहकांनी याची विशेष दखल घ्यावी, अशी विनंती दीपक गावस यांनी केली आहे.
दरम्यान या नोटिशीची गंभीर दखल घेऊन अनेक थकबाकीदारानी आपली प्रलंबित असलेली बिले भरण्यासाठी वाळपईच्या वीज कार्यालयामध्ये गर्दी करत असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. दिवशी मोठय़ा प्रमाणात थकबाकीदार सदर कार्यालयामध्ये येऊन अप्रत्यक्षपणे थकबाकी भरत असल्याचे एकूण मिळालेल्या माहितीनुसार समजते.