Tarun Bharat

कागदपत्रे हजर करा; कलामंदिर गाळेधारकांना नोटीस

Advertisements

गाळेधारकांचा नोटीस स्वीकारण्यास नकार : एक दिवसाचा अवधी देऊन महापालिकेचे अधिकारी परतले माघारी

प्रतिनिधी / बेळगाव

कलामंदिर, भाजीमंडईचे गाळे हटविल्यानंतर गाळेधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी गाळेधारकांसाठी कोणती पर्यायी व्यवस्था केली आहे, याबाबतची माहिती देण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे कागदपत्रे हजर करण्याची नोटीस महापालिकेने गाळेधारकांना देण्याचा प्रयत्न केला. पण गाळेधारकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार देऊन कागदपत्रे न्यायालयात हजर केली असल्याचे मनपा अधिकाऱयांना सांगितले.

कलामंदिरच्या जागेत बहुमजली व्यापारी संकुल उभारणीसाठी येथील मनपा कर्मचारी क्वॉर्टर्स आणि भाजीमंडई येथील गाळे हटविण्याची कारवाई केली होती. मास्टर प्लॅन योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणात नुकसान झालेल्यांना भरपाई म्हणून कलामंदिर येथे जागा मंजूर करण्यात आली होती. सदर जागेवर नुकसानग्रस्तांनी स्व-खर्चाने दुकाने व गाळय़ांची उभारणी केली होती. मात्र नुकसानग्रस्तांना पूर्वसूचना आणि अवधी न देताच गाळे हटविण्याची कारवाई केली होती.

त्यामुळे नुकसानग्रस्तांनी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयाने नुकसानग्रस्तांचे म्हणणे जाणून घेऊन पर्यायी व्यवस्थेबाबत महापालिकेकडे विचारणा केली आहे. तसेच एका महिन्याच्या आत याबाबत माहिती सादर करण्याची सूचना महापालिकेला न्यायालयाने केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांची माहिती घेण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची सूचना महापालिका प्रशासनाने नोटिसीद्वारे गाळेधारकांना केली आहे. सदर नोटीस बजावण्यासाठी गुरुवारी मनपाचे महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडपण्णावर, नंदू बांदिवडेकर, अशोक गुदली व अधिकारी कलामंदिर परिसरात दाखल झाले. नोटीस देण्याचा प्रयत्न केला असता गाळेधारकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार देऊन वकिलांच्या सल्ल्यानंतर नोटीस स्वीकारू, असे सांगितले. तसेच सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर केली असल्याचे अधिकाऱयांना सांगितले. त्यामुळे नोटीस स्वीकारण्यास एक दिवसाचा अवधी देऊन महापालिकेचे अधिकारी माघारी परतले.

Related Stories

साडय़ांचे मनमोहक प्रदर्शन ‘इप्रेशन्झ’

Amit Kulkarni

गांजाविक्रेत्यांविरुध्द बेळगाव पोलिसांची धडक मोहीम

Tousif Mujawar

४८ तासात हा प्रकार थांबला नाही तर बेळगावला जाणार- शरद पवार

Abhijeet Khandekar

रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी फळविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni

बदलत्या जीवन शैलीमुळे वंध्यत्व

Amit Kulkarni

केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत

Patil_p
error: Content is protected !!