कॅन्टोन्मेंट बोर्डचे आवाहन : यादी पाहणीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मतदार याद्या तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यालयात प्राथमिक मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याबाबत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपून दीड वर्ष झाले. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत का? असा मुद्दा उपस्थित
झाला.
2021 मध्ये लोकनियुक्त सभागृह बरखास्त
कॅन्टोन्मेंट बोर्डचा लोकनियुक्त सभागृह फेब्रुवारी 2021 मध्ये बरखास्त करण्यात आले आहे. लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपून दीड वर्षे झाली. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र अद्याप निवडणूक घेण्याबाबत कोणत्याच हालचाली नाहीत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत का? अशी विचारणा होत आहे.
मतदार याद्या तयार करण्याचा कामाला प्रारंभ
दरवषी मतदार याद्या तयार करून याबाबत आक्षेप नोंदवून घेतला जातो. त्यानतंर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातात. ही प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दरवषी राबविली जाते. यंदाही मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदार यादी तयार करतेवेळी मृत व्यक्तीचे नाव कमी केले जाते. तसेच नवीन मतदारांची नावे दाखल केली जातात. मतदाराचे नाव चुकले असल्यास दुरूस्त केले जाते. मतदार क्रमांक बदलला असल्याची याची नोंद घेतली जाते. याकरिता दरवषी मतदार याद्या प्रसिद्ध करून आक्षेप नोंदवून घेतले जातात. यावषीची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीची पाहणी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यालयात सकाळी 11 ते दु. 4 या दरम्यान 15 ऑगस्टपर्यंत करण्याची मुभा आहे. याबाबत कोणतीही चुकीची नोंद झाली असल्यास आक्षेप नोंदविण्याची सूचना करण्यात आली आहे. याबाबत दि. 17 आणि 18 रोजी सुनावणी होणार आहे.