Tarun Bharat

गायी देखील घालणार आता स्मार्टवॉच

आजार, प्रजनन अन् दूधउत्पादनावर नजर ठेवता येणार

मागील काही वर्षांमध्ये स्मार्ट टॅटूपासून संभाषण ऐकणाऱया कपडय़ांपर्यंत जगात अनेक प्रकारच्या अजब गॅजेट्स उपलब्ध झाल्या आहेत. आता यात एका नव्या स्मार्टवॉचची भर पडली असून याचा वापर गायींसाठी होणार आहे. चीनच्या साउथवेस्ट जियाओतोंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी पशूंची प्रकृती, प्रजनन आणि ठिकाण ट्रक करण्यासाठी हे विकसित केले आहे.

स्मार्टवॉच गायीच्या मानेत किंवा पायांमध्ये घातले जाऊ शकते. यामुळे गायींची अत्यंत लहान हालचालही ट्रक करण्यास मदत होणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये लिथियम बॅटरीचा वापर होणार असल्याने गायींच्या हालचालींतून निघणारी ऊर्जा बॅटरीत जमा होत हे उपकरण संचालित होत राहणार आहे. म्हणजेच पारंपरिक वॉचप्रमाणे याला वारंवार चार्ज करण्याची गरज भासणार नसल्याचा दावा संशोधनात सामील वैज्ञानिकांनी केला आहे.

स्मार्टवॉचद्वारे गायींची दैनंदिन जीवन, प्रजनन चक्र, त्यांना होणारे आजार, दूधाचे उत्पादन इत्यादींवर देखरेख ठेवता येणार आहे. यातून गायींची प्रकृती सुधारणे आणि प्रजनन करविण्यात मदत मिळेल. याचबरोबर गायींच्या आसपासच्या वातावरणाची स्थितीही ट्रक करता येणार आहे. यात ऑक्सिजन पातळी, तापमान, हवेतील आर्द्रता सामील असल्याचे अध्ययनाचे लेखक जुताओ झांग यांनी सांगितले आहे.

माणसांवर परीक्षण

स्मार्टवॉच सध्या विकासाच्या प्रारंभिक टप्प्यात आहे. या स्मार्टवॉचचे गायींपूर्वी माणसांवर परीक्षण करण्यात आले आहे. यात उपकरण छोटय़ातील छोटी हालचालही टिपत असल्याचे दिसून आले. यात तापमान आणि अन्य मोजमाप त्वरित नोंद होते. गायींसोबत हे उपकरण माणसांच्या दैनंदिन जीवनातही उपयुक्त ठरू शकते, यात स्पोर्ट्स मॉनिटरिंग, हेल्थकेअर, स्मार्ट होम आणि वायरलेस सेंसर नेटवर्क इत्यादी सामील असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

Related Stories

‘बीबीसी’च्या प्रसारणावर चीनमध्ये बंदी

datta jadhav

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; प्रकृती गंभीर

Archana Banage

नव्या ‘वर्क कल्चर’संबंधी जगभरात संशोधन

Patil_p

जपान : फुकुशिमाचे किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्यास मंजुरी

datta jadhav

अफगाणिस्तानात सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांची हत्या

datta jadhav

युक्रेन युद्धामुळे कंगाल होतोय रशिया

Patil_p