दुर्गादेवीच्या मूर्तींना चढू लागला रंग : शहरातील मूर्तिकारांकडे मूर्तींचे काम
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाची धामधूम संपताच वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. गणेशोत्सवाप्रमाणेच बेळगावमध्ये मोठय़ा जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. यासाठी दुर्गादेवीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. घटस्थापनेसाठी अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने तयारीला वेग आला आहे.
यावषी 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना असून, 5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधांमुळे साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा झाला. परंतु यावषी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दुर्गामाता दौड, रास-दांडीया महोत्सव, दुर्गादेवीचे पूजन, देवीच्या मंदिरांमध्ये विशेष पूजा होणार आहेत. यासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तींचे पूजन केले जाते. केवळ स्थानिक नागरिकच नाही तर बंगाली लोकांकडूनही दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रति÷ापना केली जाते.
पावसामुळे कामामध्ये व्यत्यय
मागील आठवडाभरापासून बेळगाव परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. याचा फटका मूर्तिकारांनाही बसत आहे. पावसामुळे मूर्ती वाळत नसल्यामुळे मूर्तिकारांना भट्टी तसेच गॅसच्या साहाय्याने ऊब देऊन वाळवाव्या लागत आहेत. पावसाचे प्रमाण केव्हा कमी होणार अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. बेळगाव शहरातील बऱयाच मूर्तिकारांकडे सध्या दुर्गादेवीच्या मूर्तींचे काम सुरू आहे.
कामाला वेग…
काही वर्षांपूर्वी केवळ दोन-तीन दुर्गादेवीच्या मूर्ती तयार केल्या जात होत्या. परंतु यावषी आठ-दहा मूर्तींची ऑर्डर आली आहे. मागील चार दिवसांपासून मूर्ती घडविण्याच्या कामाला वेग आला असून, दोन दिवसांनी रंग कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-भरत कुंभार (मूर्तिकार)