सौदी अरेबियात नावीन्यपूर्ण सेवा
माणसाने स्वतःच्या गरजेनुसार नवनव्या गोष्टोची निर्मिती करणे सुरूच ठेवले आहे. जग आता सातत्याने अत्याधुनिक होत आहे. ऑनलाइन सेवांनीही आता आधुनिक स्वरुप घेतले आहे. आता गाडी किंवा सायकलने नव्हे तर आकाशात उडून येत सामान पोहोचणार आहे.
ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यात एक डिलिव्हरी एजंट आकाशात उडून फूड डिलिव्हरी करत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ सौदी अरेबियाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे फूड डिलिव्हरीची एअर सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. या व्हिडिओला 45 लाखाहून अधिक ह्यूज आणि 81 हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
व्हिडिओत एक व्यक्ती आकाशात उडून एका इमारतीमधून दुसऱया इमारतीवर जात असल्याचे दिसून येते. हा इसम पूर्णपणे सेफ्टी फिचर्सनी युक्त होता आणि जेटपॅकच्या मदतीने उड्डाण करत होता. डिलिव्हरी एजंटचे हे रुप आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
अशाप्रकारची एअर सर्व्हिस महाग असू शकते असे लोकांचे मानणे आहे. आणखी काही कंपन्या आता रोबोट तसेच ड्रोनद्वारे देखील फूड डिलिव्हरीची सेवा सुरू करणार आहेत. अशा स्थितीत ही डिलिव्हरी एअर सर्व्हिसद्वारे नजीकच्या काळात सुरू होण्याची चिन्हे आहेत.