स्वच्छतेच्या कामावर परिणाम होण्याची शक्मयता
प्रतिनिधी /बेळगाव
मतदारयादीला आधार क्रमांक जोडण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने महापालिकेच्या महसूल विभागातील कर्मचाऱयांना टार्गेट देण्यात आले होते. पण कामाचा ताण वाढल्याची तक्रार करण्यात आल्याने आता स्वच्छता निरीक्षकांवर देखील आधार लिंक कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गणेशोत्सवामुळे आरोग्य विभागावर शहरात सर्वत्र स्वच्छतेच्या कामाची जबाबदारी वाढली आहे. ठिकठिकाणी साचणाऱया कचऱयाची उचल लागलीच करावी, असा आदेश देण्यात आला आहे. तसेच विसर्जन तलाव परिसरात साचणाऱया कचऱयाची उचल करून स्वच्छता राखण्याची सूचना मनपा स्वच्छता निरीक्षकांना करण्यात आली आहे. परिणामी गणेशोत्सवाच्या काळात कामाचा ताण वाढला आहे. अशातच आता आधार लिंकच्या कामाची जबाबदारीही स्वच्छता निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.
प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आधार क्रमांक घेऊन मतदारयादीला
जोडण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी ही जबाबदारी केवळ महसूल निरीक्षकांवर व बीएलओंवर सोपविण्यात आली होती. पण नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आधार लिंकचे काम संथगतीने सुरू आहे. आधार लिंकचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्तांनी महसूल निरीक्षकांना टार्गेट दिले होते. तसेच बीएलओंना देखील दुपारी 12 ते 2 यावेळेत हे काम करण्याचा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे. तरीदेखील आधार लिंकच्या कामाची प्रगती समाधानकारक नाही. तसेच कामाचा ताण वाढल्याची तक्रार महसूल निरीक्षक व कर्मचाऱयांनी केली आहे. त्यामुळे आधार लिंकच्या कामाची जबाबदारी आता स्वच्छता निरीक्षक व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या दोन्ही विभागामार्फत आधार लिंकसाठी घरोघरी जाऊन आधार ओळख क्रमांक घेण्याचे काम करण्यात येत आहे.