Tarun Bharat

आता वर्षभरात पंधराच गॅस सिलिंडर मिळणार

Advertisements

घरगुती गॅस वापराचा कोटा निश्चित : नवीन नियम जारी

नियमांची चौकट…

  • अनुदानित सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्णय
  • एका वर्षात अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या 15 होणार
  • 15 पेक्षा जास्त सिलिंडर घेतल्यास अनुदान मिळणार नाही

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्र सरकारने आता घरगुती गॅस सिलिंडरचा कोटा निश्चित केला आहे. नवीन आदेशानुसार, एलपीजी ग्राहकांना आता वर्षातून केवळ 15 वेळा गॅस सिलिंडर रिफिल करता येणार आहे. तसेच ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. या नव्या नियमांमुळे एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलिंडर वापरले जाणाऱयांच्या अडचणी वाढणार आहेत. अनुदानित सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून कोटा निश्चित झाल्यामुळे गैरविक्रीला आळा बसेल, असा दावा केला जात आहे.

आतापर्यंत सिलिंडर मिळविण्यासाठी महिन्याचा किंवा वर्षाचा कोटा निश्चित करण्यात आला नव्हता. मात्र नजीकच्या काळात ग्राहकांसाठी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची संख्या निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही ग्राहकाला एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. याशिवाय ग्राहकांना महिन्यात फक्त दोनच सिलिंडर घेता येणार आहेत. ग्राहकाला वर्षभरात 15 पेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील तर तेल कंपनीच्या अधिकाऱयाची परवानगी घ्यावी लागेल, असे ऑल इंडिया इंडियन डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनच्या आग्रा विभागाचे अध्यक्ष विपुल पुरोहित यांनी सांगितले.

नवीन नियमानुसार आता एका वर्षात अनुदानित 15 सिलिंडरची संख्या 15 होईल. यापेक्षा जास्त सिलिंडर खरेदी केल्यास त्यावर सबसिडी मिळणार नाही. उर्वरित सिलिंडर ग्राहकांना अनुदानाशिवाय विकत घ्यावे लागतील. आतापर्यंत काही ग्राहक जास्त सिलिंडर घेऊन इतरांना चढय़ा किमतीत विकायचे. या गैरविक्रीला आणि बेकायदेशीर मार्गांना नव्या नियमावलीमुळे चाप लागणार आहे. अहवालानुसार रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

सिलिंडर महागण्याची शक्यता

1 ऑक्टोबरपासून एलपीजीच्या किंमतीत वाढ होऊ शकते. 1 ऑक्टोबर रोजी होणाऱया किमतींच्या आढाव्यात नैसर्गिक वायूच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. सरकार दर 6 महिन्यातून एकदा गॅसची किंमत ठरवते. तसेच आता प्रत्येक महिन्याच्या प्रारंभीही कंपन्यांकडून घरगुती किंवा व्यावसायिक सिलिंडरच्या दरात फेरबदल केले जातात. सरकार दरवषी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला सहामाही आढावा घेत असते. गॅसची किंमत त्याच्यावर निर्भर असलेल्या देशातील प्रचलित किमतींवर आधारित असते. याशिवाय सीएनजीच्या दरातही वाढ होऊ शकते. एलपीजी आणि सीएनजी केवळ नैसर्गिक वायूपासून बनवले जातात.

गेल्या महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी कमी होऊन 1,976.50 रुपये झाली होती. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. मे महिन्यापासून व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत ही चौथी कपात होती. एकूणच, सिलिंडरच्या किमती 377.50 रुपयांनी कमी झाल्या आहेत. याशिवाय घरगुती स्वयंपाकात वापरल्या जाणाऱया एलपीजी गॅसच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या किमती वेगवेगळय़ा शहरात साधारणपणे 1,040 ते 1,100 रुपयांच्या आसपास आहेत.

Related Stories

तेलंगणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम कोसळले; 9 मजूर जखमी

datta jadhav

‘स्टारबक्स’चे सीईओ म्हणून भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची निवड

Archana Banage

ड्रग्ज माफियांवर धडक कारवाई

Amit Kulkarni

44 शिक्षकांचा राष्ट्रपतींकडून गौरव

Patil_p

उत्तराखंडमध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये हमरातुमरी

Patil_p

अमरनाथ यात्रा 30 जूनपासून

Patil_p
error: Content is protected !!