Tarun Bharat

आता तर हद्दच झाली….

Advertisements

बूटांमध्ये मद्य ओतून होतेय विक्री

एका प्रसिद्ध बियर कंपनीने काहीतरी अनोखे करून दाखविले आहे. स्निकर्सचे शौकीन लोक हजारो रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात. फॅशनच्या जगतात इनोव्हेशनची कधीच कमतरता नसते. परंतु कधीकधी हा प्रकार विचित्र ठरू शकतो. आता इंटरनेटवर बूट्स बियरसोबत लाँच करण्यात आले आहेत.

जगात चर्चेचा विषय ठरलेले हे बूट बियर ब्रँड कंपनीने लाँच केले आहेत. तसेच या बूट्सना हेइनकिट्स म्हटले जातेय. कस्टमाइज्ड शूजना बियर ब्रँडने प्रख्यात डिझाइनर डॉमिनिक सियाम्ब्रोन उर्फ शू सर्जच्या सहकार्याने सादर केले आहे. बूट्सचा पहिला लुक सादर करत बियर कंपनीने ‘तुमच्यासाठी सोलवर डिजाइन करण्यात आलेले हेनीकेन सिल्वर, ज्याच्या स्मूदनेसला तुम्ही आता जवळून पाहू शकता’ असे म्हटले आहे. हाइनेकिक्स दैनंदिन वापराचे बूट नाहीत, परंतु तसेही तुम्हाला दरदिवशी बियरवर चालण्याची संधीही मिळत नाही.

लिमिटेड एडिशनचे बूट हिरव्या आणि लाल रंगात प्राप्त होतील. बूटांचा सोल एका बियरने भरलेला आहे. एका विशेष सर्जिकल इंजेक्शनद्वारे बियर यात इंजेक्ट केली जाते. बूटांच्या  या अजब जोडीने सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू केली आहे.

Related Stories

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात फळ आणि भाज्यांची आकर्षक आरास

Rohan_P

कोलकाता ते मुंबई न्यायमूर्तींचा तीन दिवस प्रवास

Abhijeet Shinde

या छायाचित्राने मनचं जिंकलं

Rohan_P

रशियात कोरोनामुळे दिवसात 1000 मृत्यू

Patil_p

‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्रतिष्ठापना आणि ऑनलाईन उत्सव शनिवारपासून

Rohan_P

सदाबहार गीतांनी उलगडला संगीताचा सुवर्णकाळ

prashant_c
error: Content is protected !!