Tarun Bharat

आता कॅम्पमधील गतिरोधक वाहनधारकांना धोकादायक

Advertisements

वैज्ञानिक पद्धतीने गतिरोधक घालण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

कॅम्प परिसरातील अपघाताच्या दुर्घटनेनंतर अवजड वाहनांचा वेग रोखण्यासाठी तीन ठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत. मात्र सदर गतिरोधक अवैज्ञानिक पद्धतीने घालण्यात आल्याने वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे. अनेक वाहनांच्या चस्सीला घासत आहे. त्यामुळे याठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने गतिरोधक घालण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

खानापूर रोडवर कॅम्प येथे अवजड वाहनांच्या अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी करून रास्ता रोको केला होता. याची दखल घेत शहरातील अवजड वाहतुकीसाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खानापूर रोडवर कॅम्प परिसरात तीन ठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत. अपघाताच्या दुसऱयाच दिवशी वाहतूक बंद ठेवून रस्त्यावर सिमेंट काँक्रिटचे गतिरोधक घालण्यात आले. पण सदर  गतिरोधक वैज्ञानिक पद्धतीने घालण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. गतिरोधकाची उंची अधिक असल्याने लहान वाहनांच्या चस्सीला तसेच डिझेल-पेट्रोल टाकीला खालून घासत आहे. त्यामुळे आता खानापूर रस्त्यावरील गतिरोधक वाहनधारकांना धोकादायक बनले
आहे.

हा राज्यमार्ग असल्याने सर्वप्रकारच्या वाहनांची वर्दळ असते. कारवार, गोवा, पणजी, दांडेली, रामनगर, खानापूर अशा विविध शहराला जाणारे वाहनधारक या रस्त्याचा उपयोग करतात. त्यामुळे भरधाव धावणाऱया वाहनांना रोखण्यासाठी कॅम्प परिसरात गतिरोधक असणे गरजेचे आहे. नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी घेण्यात आलेली खबरदारी योग्य आहे. मात्र वैज्ञानिक पद्धतीने गतिरोधकाची बांधणी महत्त्वाची आहे. अन्यथा या गतिरोधकांमुळेच अपघात घडण्याची शक्मयता अधिक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देवून वैज्ञानिक पद्धतीने गतिरोधक घालावेत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

कौशल्य शिक्षणात पारंगत होणे आवश्यक

Amit Kulkarni

नंदगड येथे दौडला उदंड प्रतिसाद

Amit Kulkarni

लोकमान्य ग्रंथालयातर्फे म. फुले जयंती साजरी

Amit Kulkarni

मुरगोड स्पर्धेत युनियन जिमखानाला उपविजेतेपद

Amit Kulkarni

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातर्फे मेटगूड हॉस्पिटलमधील कर्मचाऱयांचा सत्कार

Amit Kulkarni

रेव्हेन्यू कॉलनीत 30 फूट रस्त्यावर अतिक्रमण

Patil_p
error: Content is protected !!