NTSE Scheme : केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. याबाबत NCERT कडून नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ही संस्था समन्वयक संस्था म्हणून काम करते. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे योजनेचं उद्दिष्ट आहे.
या योजनेसाठी ३१ मार्च २०२१ पर्यंतची मान्यता देण्यात आली होती. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ही शिष्यवृत्ती योजना पुढे चालवण्यासाठी नव्याने परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ही शिष्यवृत्ती योजना स्थगित करण्यात येत असल्याचं त्यात नमूद केलं आहे.
विद्यार्थ्यांसाठी परीक्षा का महत्त्वाची
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन स्तरांवर घेतली जाते. यातून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी प्रत्येक राज्याला कोटा ठरवून दिला जातो. दहावीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.


previous post
next post