लिम्का बुकमध्ये होणार विक्रमाची नोंद
डेहराडून / वृत्तसंस्था
जगप्रसिद्ध चारधाम यात्रेदरम्यान दर्शन घेणाऱया भाविकांच्या आकडय़ाने यंदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार 50 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी चारधामला भेट दिली. या विक्रमाची नोंद यंदा लिम्का बुकमध्ये होणार असल्याचे उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी स्पष्ट केले. गेल्या वषी ही संख्या 20 लाखांपेक्षा कमी होती.
बद्रीनाथ धामचे दरवाजे 19 नोव्हेंबरला बंद होणार आहेत. तोपर्यंत भाविकांची ये-जा सुरूच राहणार आहे. गंगोत्री धाम, यमुनोत्री धाम आणि केदारनाथ धामचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे सहा महिने बंद केल्याने आता उत्तराखंड सरकारचे लक्ष हिवाळी चारधाम यात्रेवर असेल. गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे निर्बंध लागू करण्यात आले होते. विविध निर्बंधांमुळे भाविकांची संख्या 20 लाखांच्या खालीच होती. यंदा मात्र भाविकांवर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे अधिकाधिक भाविकांनी दर्शन घेतले.