वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरिओ (ब्राझील)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या रिओ खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या द्वितीय मानांकित कॅमेरून नुरीने स्पेनच्या टॉप सिडेड कार्लोस ऍलकॅरेझचा पराभव करत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
रविवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकीत नुरीने ऍलकॅरेझचा 5-7, 6-4, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव केला. एटीपी टूरवरील स्पर्धेतील नुरीचे हे पाचवे विजेतेपद आहे. हा अंतिम सामना अडीच तास चालला होता.