Tarun Bharat

भातरोप लागवडीसाठी पोषक वातावरण

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

आठवडय़ापासून पावसाने जोर धरला होता. त्यामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे. मात्र, रविवारी पुन्हा पावसाचा जोर कमी झाला असल्याने पश्चिम भागात भातरोप लागवडीसाठी रविवारी पोषक वातावरण निर्माण झाले होते.

शनिवारी दिवसभर संततधार पाऊस पडत होता. पण पावसाने रविवारी उसंत घेतली असल्याने व शेतात भात रोप लागवडीसाठी शिवारात पाणी असल्याने शेतकऱयांनी लागवडीची कामे पूर्ण करून घेतली. काही जणांनी दुबार पेरणी केली आहे.  या अगोदर शेतकऱयांची बटाटा लागवड, भुईमूग पेरणी रताळी व लागवडीची कामे पूर्ण झालेली आहेत. या पिकांना खत देण्याचे कामसुद्धा करण्यात आले.  शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सर्व  सदस्य शेतीकामात गुंतून होते. त्यामुळे गावातील सर्वजण शिवारात असल्याचे बोलले जात होते, तसा व्हिडिओ मोबाईलवर फिरत होता.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नुकतीच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे योग्य प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून दरवषीच या पिकांना फटका बसत आहे. यावषी चांगले वातावरण असल्याने शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Related Stories

हनीट्रप : भावनिक भांडवल मात्र आर्थिक दलदल

Amit Kulkarni

रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनतर्फे दांडिया महोत्सव

mithun mane

पथदीपांचा निधी गेला कुठे?

Amit Kulkarni

भुतरामट्टी परिसरात बटाटा पिकाची उत्तम वाढ

Amit Kulkarni

कडोलीच्या अभिजित पाटीलचे के-सेट परीक्षेत यश

Patil_p

संस्कारी पिढीसाठी मराठी भाषा प्रभावी माध्यम

Amit Kulkarni
error: Content is protected !!