ऑनलाईन टीम/ख्राईस्टचर्च
भारतीय संघाला एकदिवशीय मालिकेपाठोपाठ कसोटीतही पराभवाला समोरे जावे लागले आहे. या पराभवानंतर न्यूझीलंड संघाने विराट सेनेला सलग दुसर्यांदा व्हाईटवॉश दिला. दुसर्या कसोटीत न्यूझीलंडने 7 विकेट राखून भारतावर विजयी मिळवला. भारताने दुसर्या डावात ठेवलेल्या 132 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 7 विकेट राखत सहज पार केले.
भारताने पहिल्या डावात पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 242 धावा केल्या. यानंतर दुसर्या डावात न्यूझीलंडला 235 धावात रोखत भारताने 7 धावांची आघाडी मिळवली. भारतीय फलंदाज मोहम्मद शमीने 4 तर बुमराहने 3 विकेट घेत न्यूझीलंडच्या धावसंख्येला ब्रेक लावला. यानंतर भारतीय संघाने फलंदाजी करत असताना न्यूझीलंडसमोर फक्त 132 धावांचे आव्हान दिले.
न्यूझीलंडच्या संघाने हे 132 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर टॉम लॅथम याने 52 तर टॉम ब्लंडेल यांने 55 धावाची अर्धशतकी खेळी करत संघास विजयी मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. उमेश यादवने लॅथमला बाद करत या सलामीवीरांची जोडी तोडली. तर बुमराहने दोन विकेट घेतल्या.