Tarun Bharat

आडनावावरुन ओबीसींचा डेटा गोळा करणं अयोग्य; छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबई: ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राज्यात गोंधळ सुरु आहे. भाजप नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी आडनावावरुन ओबीसींचा डेटा गोळा करणं अयोग्य असल्याचे म्हटलं आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा-
घरगुती गॅस कनेक्शन महागले

मंत्री भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी अशी मागणी पत्रात केली आहे. ओबीसींचे नुकसान होऊ देऊ नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांना केले. पुढे बोलताना ते म्हणाले, चुकीच्या पध्दतीने माहिती गोळा केली जात आहे. झोपडपट्टीत उच्चवर्णीय राहत नाहीत. मोठ्या शहरात ५ टक्के ओबीसी राहतात असे दाखवले जात आहे. यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे असा आरोप ही त्यांनी केला. याची कसून चौकशी व्हावी असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

बेळगावसह राज्यातील तीन महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं

Archana Banage

‘देवेंद्र फडणवीसांनी सत्ता काळात संघाला किती वाटा दिला’

Archana Banage

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 543 रुग्णांची भर

Tousif Mujawar

पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar

कलम ३७० हटवल्यानंत्तर अमित शाह पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर

Archana Banage

कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे सव्वा चार कोटी खर्च

Patil_p