Tarun Bharat

OBC RESERVATION : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतच्या (OBC RESERVATION) सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतछ्या प्रलंबित याचिकांवर ५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार होती. आता याची सुनावणी लांबणीवर पडली आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत प्रलंबित असणाऱ्या याचिकांवर आता १३ डिसेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे. तर येत्या दिवसांनंतर सुप्रीम कोर्टाला पंधरा दिवसांची ख्रिसमस सुट्टी असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावरील सुनावणी आता जानेवारी महिन्यात जाण्याचे संकेत आहेत. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने २०२१ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या सदस्य संख्येत वाढ केली होती. ९२ नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण तसेच मतदार यांदीची कार्यवाही वाढीव सदस्य संख्येच्या आधारावर पूर्ण केली होती. मात्र ४ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे सदस्य संख्येतील वाढ, निवडणूक आयोगाने केलेली प्रभाग रचना, आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही राज्य शासनाने रद्द केली. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत. मागील चार ते पाच वेळेस सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नव्हती, अखेर आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र आजची सुनावणीही लांबणीवर गेली आहे.

Related Stories

दिलासादायक : महाराष्ट्रात उच्चांकी डिस्चार्ज

Tousif Mujawar

भारतात मागील आठ वर्षात ७५० वाघांचे मृत्यू

datta jadhav

ओमायक्रॉनवर प्रभावी ठरलेल्या फायझरच्या गोळीला मंजुरी

datta jadhav

परिस्थिती हाताबाहेर, काबुल विमानतळावर लाखोंची गर्दी

datta jadhav

इचलकरंजीची वारणा योजना रद्द होणार ?

Archana Banage

साताऱ्यातील तरूणाचा महामार्गावर आत्महत्येचा प्रयत्न

Archana Banage