Tarun Bharat

भर रस्त्यात भटक्या जनावरांचा अडथळा

Advertisements

वाहनधारकांना धोका : अपघाताची शक्यता : बंदोबस्ताची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

अलिकडे शहरात भटक्मया जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत ती डोकेदुखी ठरत आहेत. शहराबाहेरील रस्त्याबरोबर शहराअंतर्गत रस्त्यांवर भटक्मया जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. जनावरे रस्त्यांच्या मधोमध बसत असल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. मनपा प्रशासनाने भटक्मया जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा.

 शहरातील गणपत गल्ली, मारूती गल्ली, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, यंदे खुट, चन्नम्मा चौक, क्लब रोड आदी भागात या जनावरांचा वावर वाढला आहे. दरम्यान जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी अपघाताचाही धोका निर्माण होत आहे. बाजारपेठेबरोबर शहराबाहेरील रस्त्यांवरही या जनावरांचा त्रास सुरू आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होवून काहीवेळा वाहतूक कोंडीदेखील होत आहे. विशेषतः रात्रीच्या अंधारात किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. दसरोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची ये-जा वाढली आहे. त्यातच ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान भरधाव वाहनांच्या धडकेमुळे लहान वासरे जखमी होण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. मनपाने भटकी जनावरे पकडण्याची मोहीम सक्रिय करावी, अशी मागणी होत आहे.

शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ते, सिग्नल, चौक, कचराकुंडय़ा आदी ठिकाणी त्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे शहरात पादचारी व वाहनधारकांनाही या जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि चौकामध्ये भटक्मया जनावरांचा कळप फिरताना दिसत आहे. बाजारपेठेबरोबर शहराबाहेरील मार्गांवरही या जनावरांचा त्रास सुरू झाला आहे. या जनावरांना तातडीने पकडून त्यांची गो-शाळेत रवानगी करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

प्रस्तावित योजनेतील फ्लॅटकरिता अर्ज भरण्यासाठी गर्दी

Amit Kulkarni

कारने ठोकरल्याने दोन महिला ठार

Patil_p

पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या

Omkar B

जगजंपी उभारणार हॅप्पी होम

Amit Kulkarni

मण्णूर कन्नड शाळा इमारतीवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान

Amit Kulkarni

चंदगड तालुक्यात कोरोनाचे नवे तीन रूग्ण

Patil_p
error: Content is protected !!