Tarun Bharat

शनिवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी

Advertisements

हवेत गारवा, मात्र पावसाला म्हणावा तसा जोर नाही

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. शनिवारी दिवसभर अधूनमधून लहान, मोठय़ा सरी कोसळत होत्या. मात्र अद्यापही म्हणावा तसा पावसाला जोर नाही. मात्र या पावसामुळे साऱयांनाच दिलासा मिळाला आहे.

शुक्रवारी पहाटेपासून मान्सूनला सुरुवात झाली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी देखील पावसाला सुरुवात झाली. काही दमदार सरी कोसळल्या. मात्र अजूनही जोरदार पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. शनिवारीही सकाळपासून अधूनमधून सरी कोसळत होत्या. त्यामुळे दुचाकीस्वार, फेरीवाले, बैठे व्यापारी यांना पावसाचा त्रास सहन करावा लागला.

पावसामुळे सोयाबिन, भुईमूग, बटाटा लागवडीसाठी शेतकऱयांची धडपड सुरू झाली आहे. यावषी मान्सूनचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे या पिकांच्या पेरणीला उशीर झाला आहे. काही भागांमध्ये शेतकऱयांनी भातपेरणी केली आहे. त्याची उगवण बऱयापैकी झाली आहे. काही भागात उशिराने पेरणी केलेल्या भातपिकाला उगवणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. सध्या या पावसामुळे शेतकरी कामात गुंतला आहे.

पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाला जोरदार सुरुवात होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. शनिवारी दिवसभरच तसेच सायंकाळी पावसाचा शिडकावा सुरू होता. पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांचा छत्री, जॅकेट, रेनकोट खरेदी करण्याकडे कल दिसून आला.

Related Stories

केदनूरच्या सौंदर्या अजाणी ठरल्या इलेक्ट्रिक स्कूटीच्या मानकरी

Amit Kulkarni

ऍग्री गोल्ड एजंट-गुंतवणूकदारांचे 20 रोजी आंदोलन

Amit Kulkarni

इनरव्हील क्लबचा अधिकारग्रहण समारंभ उत्साहात

Patil_p

टॅक्सी मालक-चालक असोसिएशनतर्फे अल्पदरात रुग्णवाहिका उपलब्ध

Omkar B

शहरात मतदान जनजागृती रॅली

Patil_p

गॅस सिलिंडरपेक्षा चूलच बरी!

Amit Kulkarni
error: Content is protected !!