छोटी शहरे जिंकून युपेनवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न, पाश्चात्यांना इशारा
वृत्तसंस्था/ मॉस्को
युपेनमधील पूर्व आणि दक्षिण भागातील काही छोटय़ा शहरांवर ताबा मिळविल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. युपेनवरील हल्ले आगामी काळात आणखी तीव्र केले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. पूर्व युपेनमधील क्रॅमॅटोरस्क हे छोटे शहर शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्यानंतर शनिवारी आसपासच्या नागरी वस्त्यांवर रशियाकडून क्षेपणास्त्रs डागण्यात आली आहेत.
शनिवारी लिमॅन नावाचे 20 हजार लोकसंख्येचे शहर रशियाच्या ताब्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या शहरात युपेनचे महत्त्वाचे रेल्वेस्थानक असल्याने आता युपेनमधील रेल्वेवाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच रेल्वेस्थानकामधून युपेनच्या सैनिकांना शस्त्रs पुरविण्यात येत होती. तसेच नागरिकांचे स्थानांतरण करण्यात येत होते. डोनेटस्क आणि लुहानस्क या मोठय़ा शहरांची काही उपनगरे रशियाच्या सैनिकांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
रशियाचा आत्मविश्वास वाढणार
गेल्या तीन दिवसांत मिळालेल्या यशामुळे रशियन सैनिकांचा आत्मविश्वास वाढणार असून रशियाकडून आणखी मोठे हल्ले होण्याची शक्मयता युपेनच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. युपेनला मोठय़ा प्रमाणावर शस्त्रपुरवठा युरोप आणि अमेरिकेकडून करण्यात येत असला तरी रशियाने प्रदीर्घ काळ युद्ध चालू ठेवण्याची तयारी केल्याचे दिसून येते. युपेनचे सैनिक अद्यापही यशस्वीरीत्या प्रतिकार करत असून रशियाची पुढची चाल मंद झाली आहे. तथापि, युद्ध थांबविण्याच्या प्रयत्नात युपेनला फारसे यश आलेले नाही. रशियाचे हल्ले परतविण्यासाठी आणखी मोठय़ा शस्त्रास्त्र आणि वित्तसाहाय्याची आवश्यकता असल्याचे युपेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे.
90 टक्के इमारती नष्ट
रशियाला लागून असणाऱया युपेनच्या चार महत्त्वाच्या शहरांमधील 90 टक्के इमारती रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट किंवा क्षतीग्रस्त झाल्या आहेत. या शहरांमधून 20 लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. त्यांचे पुनर्वसन आणि शहरांची पुनर्बांधणी यासाठी युद्धानंतरही युपेनला मोठा खर्च करावा लागणार आहे. युरोप आणि अमेरिकेच्या अर्थसाहाय्याशिवाय हे काम अशक्मय असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ञांनीही स्पष्ट केले आहे. युद्ध लवकर थांबणे हाच हानी थांबविण्याची सर्वात प्रभावी मार्ग असल्याचेही त्यांचे मात आहे.