क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील ओडिशा एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत संपली. काल हा सामना भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळविण्यात आला. या निकालाने दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला.
एटीके मोहन बागानचे आता 10 सामन्यांतून 6 विजय, दोन बरोबरी व दोन पराभवांनी 20 गुण झाले आहेत. ओडिशाचे 10 सामन्यांतून सहा विजय व एका बरोबरीने 19 गुण झाले आहेत. सध्या गुणतालिकेत एटीके मोहन बागान तिसऱया तर ओडिशा एफसी चौथ्या स्थनावर आहेत. आज कोलकातात ईस्ट बंगाल अणि मुंबई सिटी एफसी संघात सामना होईल.