ऑनलाईन टीम तरुण भारत :
भारताचे ओडिशा (पूर्वीचे ओरिसा) आपल्या ‘स्वादिष्ट खाद्यपदार्थाने’ सर्वात जास्त प्रभावित करत आले आहे. ओडिशाचे जेवण हे मसाले आणि तेल यांचा वापर कमी असून देखील चवीला मात्र एकदम स्वादिष्ट असे असते. जेव्हा तुम्ही ओडिशाला भेट द्याल तेंव्हा सालच्या पानांवर दिलेले एकापेक्षा एक चांगले पदार्थ तुम्हाला सुगंधाने आकर्षित करतात. ओडिशातील लोकांना त्यांचे गोड पदार्थ आवडतात म्हणून तुम्हाला या राज्यात सर्वत्र मिठाईची खूप दुकाने पाहायला मिळतील.
ओडिशा हे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय दोन्ही राज्यांनी वेढलेले असल्याने, ओडिशाच्या पाककृतीवर प्रामुख्याने उत्तर भारत, बंगाल आणि आसामच्या खाद्यपदार्थांचा प्रभाव आहे. तांदूळ हे ओडिशाचे मुख्य अन्न आहे आणि अनेक घरांमध्ये मोहरीचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. येथील चुंगडी मलाई या लोकप्रिय रेसिपी बद्धल सांगणार आहोत.
चुंगडी मलाई
नारळाचे दुध आणि झिंग्यापासून बनवण्यात आलेले ‘चुंगडी मलाई’ येथील खूपच प्रसिद्ध व्यंजन आहे. हलके मसाले, यापासून ही डिश बनवली जाते. झिंगे हे येथे सर्रास जेवणात असतातच. ताजे झिंगे, नारळाचा मलईदार पणा या डिशला आणखी स्वादिष्ट बनवते. येथे भातासोबत चुंगडी मलाई जेवणात वाढली जाते. चुंगडी मलाईला पाहूनच तोंडाला पाणी सुटते. ही डिश खाण्यासाठी पर्यटक खूप लांबून येथे येतात. तुम्ही जर ओडिशाला कधी गेलात तर चुंगडी मलाई ची चव चाखायला विसरू नका.