Tarun Bharat

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान पुण्याच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’ला

पुणे / प्रतिनिधी :

‘Maharashtra-Kesari’ news : कुस्तीतील मानाच्या मानल्या जाणाऱ्या 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा बहुमान पुण्याच्या ‘संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे. स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानकडे दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण लवकरात लवकर कळवण्याच्या सूचना या पत्रात कुस्ती महासंघाने दिल्या आहेत.

नवी दिल्ली येथे बृजभूषण शरण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. या वेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके समवेत होते. बृजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘महाराष्ट्र केसरी’ अधिकृतपणे कोण भरवणार, याबाबत संभ्रम होता. मात्र, कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, महासंघाच्या अस्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे यासंदर्भातील कार्यभार असेल.

अधिक वाचा : कुस्तीगीर परिषदेचा वाद अखेर मिटला; बाळासाहेब लांडगेंचा राजीनामा

महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र केसरी’चे जनक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबियांकडे ‘महाराष्ट्र केसरी’चे आयोजन येणे, ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे. प्रत्येकाच्या स्मरणात राहील आणि कुस्तीला यापेक्षाही अधिक उंचीवर नेता येईल, अशा प्रकारचे आयोजन करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. लवकरच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

पवार, लांडगेंचा राजीनामा, आता आश्रयदात्याची भूमिका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या मध्यस्थीने कुस्तीगीर परिषदेतील वादावर तोडगा काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी या परिषदेच्या अध्यक्षपदाचा, तर बाळासाहेब लांडगे यांनी सचिवपदाचा राजीनामा भारतीय कुस्ती महासंघाकडे दिला आहे. आता शरद पवार यांना मुख्य आश्रयदाते म्हणून कुस्तीगीर परिषदेमध्ये मान देण्यात आला आहे, तर बाळासाहेब लांडगे यांना आश्रयदाते म्हणून परिषदेत सामावून घेण्यात आले आहे. यापुढे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे काम नवीन कार्यकारिणी पाहाणार आहे.

Related Stories

घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ

Patil_p

“आगे आगे देखो होता है क्या…”; शिंदेंच्या बंडावर गडकरींचे सूचक वक्तव्य

Archana Banage

भिलवडीत कोरोनाबाधित सराफाच्या घरात १० लाखांची चोरी

Archana Banage

पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन

Tousif Mujawar

पी. डी. पाटीलसाहेबांना अभिवादन

Patil_p

‘विधान परिषदे’चा फैसला ऑक्टोबरमध्ये

Archana Banage