Tarun Bharat

दूधसागर पर्यटन हंगामाला औपचारिक सुरुवात

Advertisements

रस्ता दुरुस्ती व पाऊस ओसरताच हंगाम सुरु

प्रतिनिधी /धारबांदोडा

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कुळे येथील दूधसागर पर्यटन हंगामाला औपचारिक सुरुवात आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. दरवर्षी गांधी जयंतीपासून येथील पर्यटन हंगामाला सुरुवात केली जाते. मात्र यंदा पाऊस सुरु असल्याने व रस्त्याच्या दुरुस्तीमुळे हंगामाची सुरुवात प्रत्यक्षात करणे शक्य होत नाही. याबद्दल खंत व्यक्त करीत, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष पर्यटनाला सुरुवात होईल, असे आमदार गणेश गावकर यांनी यावेळी जाहीर केले.

दूधसागर धबधब्यासह अन्य प्रेक्षणीय स्थळे पर्यटनीय प्रवाहात  

वन खाते, पर्यटन खाते आणि पर्यटन विकास महामंडळातर्फे संयुक्तरित्या येथील पर्यटनाला चालना देण्याचे काम सध्या सुरु आहे. दूधसागर धबधबा, राक्षक मळीकेश्वर मंदिर, तांबडीसुर्ला येथील प्राचिन महादेव मंदिर, मोले येथील जैवविविधता उद्यान, मोले आर्बोटोरियम व बोंडला अभयारण्य या आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांचा दूधसागर पर्यटनात समावेश केला जाणार आहे. ज्यामुळे येथे येणारे पर्यटक निदान एक दिवस वास्तव्य करुन पर्यटनाचा आनंद लुटू शकतील. या योजनेचा लाभ स्थानिक युवकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीमध्ये होईल, असे आमदार गणेश गावकर यांनी सांगितले. दूधसागर धबधब्याजवळ पर्यटकांसाठी आवश्यक साधनसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. सावर्डे मतदार संघाचा पर्यटनीय आराखडा तयार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी याविषयी अनेक वेळा चर्चाही झाली आहे. मात्र येथील पर्यटन व्यावसाय व्यवस्थीतपणे चालण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कुळेतील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून दूधसागर धबधबा पर्यटन स्थळ हे भावी पिढीसाठी टिकून ठेवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. चांगल्या कार्याला आपला नेहमीच पूर्ण पाठिंबा असेल असे त्यांनी पुढे नमूद केले.

यावेळी व्यासपीठावर दक्षीण गोवा जिल्हा अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, कुळे पंचायतीचे सरपंच गोविंद शिगावकर, उपसरपंच नेहा मडकईकर, पंचसदस्य अश्विनी देसाई, सोनम डोईफोडे, अनिकेत देसाई, अजय बांदेकर, साईश नाईक, प्रसाद गावकर, दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक खांडेपारकर, उपाध्यक्ष अशोक गावकर, खजिनदार मंगलदास च्यारी, कार्यकारी सदस्य नंदेश नाईक देसाई, दिलीप मायरेंकर, सतीश सातपालकर, पोलीस उपनिरीक्षक अजय धुरी व वनअधिकारी श्री. बावकर हे उपस्थित होते.

दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशनला कुळे शिगाव पंचायतीचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या पूर्ण केल्या जातील. मात्र पर्यटकांसाठी जी लाईफ जॅकेट पुरविली जातात, ती पुन्हा व्यवस्थीत आणून देण्याची जबाबदारी जीप मालकानी घ्यावी. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच गोविंद शिगावकर यांनी केले. सुवर्णा तेंडुलकर यांचे यावेळी भाषण झाले. अशोक खांडेपारकर यांनी स्वागत केले. सत्यवान नाईक यांनी सूत्रसंचालन तर सतीश सातपालकर यांनी आभार मानले.

Related Stories

हरमलात दीड लाखांचा अमली पदार्थ जप्त

Amit Kulkarni

फोंडय़ातील रस्त्यांची दुर्दशा मलनिस्सारण प्रकल्पामुळे

Omkar B

कुडतरी माकाजन जमीनीत प्रकल्प उभारा

Amit Kulkarni

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाडले

Patil_p

बारामाही वाहणारा वायंगीणी धबधबा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू.

Omkar B

पी. एस. श्रीधरन पिल्लईंचे गोव्यात आगमन

Amit Kulkarni
error: Content is protected !!