Tarun Bharat

पंचायत राज विभाग जम्मू-काश्मिरचे अधिकारी गुरुवारी सातारा दौऱ्यावर, नागझरी गावाला देणार भेट

जिल्हा परिषदेच्याही कामकाजाची माहिती घेणार

प्रतिनिधी/सातारा

सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतात. तसेच सातारा जिल्हा परिषदेने राज्य व देश पातळीवर स्वच्छतेत पुरस्कार मिळवले आहेत. पंचायत राजमध्ये राज्य पातळीवर नाव केले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा कारभार पाहण्यासाठी व कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील गावाने राबवलेल्या योजनांची व त्या गावच्या कारभाराची माहिती घेण्यासाठी जम्मू – काश्मिरमधील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची पथक दि.18 रोजी येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन व नागझरी ग्रामपंचायतीचे प्रशासन स्वागतासाठी तयार आहेत.

सातारा जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात आलेल्या योजना देश पातळीवर गाजल्या आहेत. त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान, पंचायत राज सशक्तीकरण अभियान, नुकतेच सुरु असलेले धारावु अभियान, महिला बालकल्याण विभागाचे पोषाण आहार अभियान. त्या अभियानाच्या अनुषंगाने राज्य आणि केंद्र शासनाने अनेकदा सातारा जिल्हा परिषदेचा गौरव केला आहे. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, प्रकल्पाधिकारी श्रीमती देसाई यांच्यासह सर्वच टीम अतिशय चांगले काम करत आहेत. प्रत्येक विभागामध्ये चांगले काम सुरु असून त्याच कामाची माहिती देण्याकरता जम्मू काश्मिर येथून येणाऱया लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाला माहिती देण्यात येणार आहे.

हा अभ्यास गट जिल्हा परिषदेत दि. 18 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत असणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाचे कामकाज कसे चालते याची माहिती घेणार आहेत. तसेच कोरेगाव तालुक्यातील नागझरी या गावासही सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत भेट देणार आहेत. त्या गावामध्ये सरपंच जितेंद्र भोसले यांच्याकडून गावात राबवण्यात आलेली पाण्याची योजना, राहणीमान व इतर योजनांची माहिती देणार आहेत. त्यानंतर दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पंचायत समितीला हा अभ्यास गट भेट देणार आहे. या अभ्यास गटाच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद तयारीत आहे.

Related Stories

डॉ. सुभाष चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सकपदी हजर

Patil_p

साताऱयात मटका बोकाळला

Patil_p

शहरात वाढतोय डेंग्यु

Patil_p

खटाव तालुक्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू

Patil_p

बँकेच्या जप्तीच्या तणावातून पती, पत्नीचे विषप्राशन

Patil_p

शैक्षणिक फी साठी पालकांची अडवणूक करू नये-उदयनराजे

Amit Kulkarni