Tarun Bharat

ऑईल इंडियाचा तिमाहीत नफा तिपटीने वाढला

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडचा जून तिमाहीतील निव्वळ नफा तिप्पट वाढत 1,555.46 कोटी रुपये झाला आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 507.94 कोटी रुपये होता.

ऑईल इंडियाने यावेळी तेल आणि वायूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे  कंपनीच्या नफ्यात वाढ झाल्याचे सांगितले आहे. तिमाहीत, कंपनीला कच्च्या तेलाच्या विक्रीवर प्रति बॅरल 112.72 डॉलर प्राप्त झाले. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कच्च्या तेलाच्या विक्रीवर प्रति बॅरल 67.15 डॉलर प्राप्त झाले होते.

गॅस विक्रीतून कंपनीला दुप्पट लाभ

गॅसच्या विक्रीतून कंपनीचे उत्पन्न दुपटीने वाढले. या कालावधीत, गॅसच्या किमती 6.1 डॉलर प्रति युनिट पर्यंत वाढल्या, मागील वर्षी प्रति युनिट 1.79 डॉलर होत्या. 

Related Stories

ऍपलचा आयफोन-12 बाजारात दाखल

Omkar B

एलजीचा 64 लाखाचा टीव्ही लाँच

Patil_p

टाटा कॉफीच्या निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ

Patil_p

रिलायन्सला मागे टाकत एचडीएफसी दुसऱया स्थानी

Patil_p

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिटकार्डसाठी अर्जात वाढ

Patil_p

खाद्यतेलाची आयात 23 टक्क्यांनी वधारली

Patil_p
error: Content is protected !!