Tarun Bharat

ओकीनावा सर्वाधिक दुचाकी बनविणारी कंपनी

नवी दिल्ली : ओकीनावा ही कंपनी देशातील सर्वात जास्त इलेक्ट्रीक दुचाकी निर्मिती कंपनी बनली आहे. कंपनी येत्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी 1200 ते 1500 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचे समजते. सदरची गुंतवणूक ही टप्प्याटप्प्याने पुढील दोन वर्षांमध्ये केली जाणार आहे.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन अर्थात फाडा यांनी ओकीनावा ही सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी कंपनी असल्याचे म्हटले आहे. मे 2022 मध्ये 9 हजार 309 वाहनांची विक्री कंपनीने केली आहे. या तुलनेमध्ये मागीलवषी याच महिन्यामध्ये नाममात्र 217 दुचाकी विक्री करण्यात आल्या होत्या.

2017 मध्ये भारतात कंपनीचे पहिले उत्पादन लाँच करण्यात आले होते. त्यानंतर 1 लाख 50 हजार इतक्मया दुचाकी भारतातील रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. मेमधील कंपनीच्या दुचाकीना राहिलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता कंपनीने या क्षेत्रात विस्ताराची योजना आखलेली आहे. इलेक्ट्रीक दुचाकीचे जाळे जास्तीत जास्त शहरांपर्यंत विस्तारीत करण्याला कंपनी येत्या काळामध्ये प्राधान्य sदेणार आहे, अशी माहिती ओकीनावाचे व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक जितेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

महत्त्वाचे……

  • 2017 मध्ये कंपनीची सुरूवात
  • 1.50 लाख दुचाकी भारतीय रस्त्यावर
  • मेमध्ये 9 हजार दुचाकींची विक्री

Related Stories

जीपची नवी ट्रेलहॉक गाडी बाजारात लाँच

Patil_p

अशोक लेलँडचा नवा ट्रक

Patil_p

बजाज कंपनीची नवीन पल्सर पी 150 लाँच

Patil_p

आल्टो 16 व्या वर्षीही बेस्ट कार

Patil_p

स्विच मोबिलिटीकडून इलेक्ट्रिक बस ईआयईव्ही 12 सादर

Amit Kulkarni

सोनालिका ट्रक्टर्स विक्रीत वाढ

Patil_p