नवी दिल्ली
इलेक्ट्रिक स्कूटर एस1 प्रो आणि एस1 या मॉडेलची विक्री करणाऱया ओला इलेक्ट्रिकने गेल्या महिन्यात 20,000 युनिटचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे.
सणासुदीच्या काळात चांगली कामगिरी केल्याचे कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे. नवरात्रीच्या काळात कंपनीची विक्री चार पटीने तर विजयादशमीला दहा पटीने वाढल्याचीही नेंद केल्याची माहिती आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर एस1 प्रो आणि एस1 साठी सप्टेंबर 2021 मध्ये ऑनलाइन खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर जुलै 2021 मध्ये 499 रुपयांस गाडीचे बुकिंग सुरू केले होते.