प्रतिनिधी / नवी दिल्ली
इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ओला कंपनी येत्या 9 फेब्रुवारीला मोठा धमाका बाजारात उडवणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये कंपनी तीन इलेक्ट्रिक दुचाकी सादर करणार असल्याचे कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी सांगितले आहे.
प्राप्त अहवालानुसार ओला लवकरच भारतीय बाजारात ईव्ही दुचाकी आणणार असून ओला आउट ऑफ द वर्ल्ड, ओला परफॉर्मेक्स आणि ओला रेंजर अशी या गाडय़ांची नावे राहणार आहेत. यामध्ये कमाल श्रेणी आणि ताशी 100 किमीपेक्षा जास्त वेग प्राप्त करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. साधारणपणे ईव्ही दुचाकीची किंमत ही 85 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.
यातील दुचाकी ही एका चार्जवर जवळपास 174 किमी इतक्या वेगाने धावणार असल्याची माहिती आहे. ओलाच्या लाईनअपमधील रेंजर ही सर्वात स्वस्त बाइक राहणार आहे. त्याची सुरुवातीची किंमत 85 हजार रुपयांपासून सुरू होणार आहे. टॉप मॉडेलची किंमत 1.05 लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. हे मॉडेल 3 प्रकारांमध्ये येणार आहे. बेस मॉडेलची रेंज 80 किमी आणि टॉप स्पीड 91 किमी/तास असेल. मिड वेरिएंटची किंमत 95,000 रुपये असू शकते. याची रेंज 117 किमी आणि टॉप स्पीड 91 किमी/तास असेल, तर प्रीमियम मॉडेलला 153 किमीची रेंज आणि 91 किमी प्रतितासचा टॉप स्पीड मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.