Tarun Bharat

ओलाची आंतरराष्ट्रीय बाजारात एंट्री

Advertisements

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रिकने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी पहिल्यांदा नेपाळमध्ये विक्री करण्यासाठी कंपनी पुढाकार घेणार आहे. यावर्षाच्या अखेरपर्यंत ओला आपल्या एस-1 व एस-1 प्रो अशा दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स नेपाळमध्ये सादर करणार आहे.

अशा पद्धतीने ओला इलेक्ट्रिक जागतिक स्तरावर आपल्या गाडय़ांचे सादरीकरण आगामी काळात टप्प्याटप्प्याने करणार आहे. नेपाळमध्ये सदरच्या इलेक्ट्रिक गाडय़ा सादर केल्या जाणार असून त्या देशाबरोबर कंपनीने नुकताच एक सहकार्याचा करार केला आहे. नेपाळमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढील काळामध्ये ओला इलेक्ट्रिकने आशिया देशांसोबत युरोपमध्येही आपल्या गाडय़ांचे सादरीकरण करण्याचे निश्चित केले आहे.

व्यवसाय विस्तारासाठी सज्ज- अग्रवाल

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहने आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करून कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार नेपाळसह इतर पाच आंतरराष्ट्रीय देशांमध्ये करणार आहे. सध्याला इलेक्ट्रिक वाहनांविषयी पश्चिमी देश आणि चीन याठिकाणीच वापर अधिकचा दिसून येतो आहे. या अनुषंगाने वरील देशांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी सादर करण्याचा कंपनीचा इरादा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारासाठी लागणाऱया इलेक्ट्रिक स्कूटर्सपैकी निम्म्या भारतामध्येच तयार केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत देश इलेक्ट्रिक वाहनांप्रती आघाडी घेऊ शकल्यास ते जास्त आनंददायी असणार असून आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या माध्यमातून पाहता तेथे चांगली ग्राहकसेवा देण्याप्रतीही कंपनी कटिबद्ध असणार आहे, असेही ते म्हणाले.

सध्याला एस-1 आणि एस-1 प्रो या ई स्कूटर्स त्यांची किंमत अनुक्रमे 99,999 रुपये, 1,40,000 रुपये इतकी असून भारतातच विकल्या जात आहेत. एस-1 ही 141 कि. मी. मायलेज देते तर एस-1 प्रो 181 कि. मी. इतके मायलेज देते.

Related Stories

विवो भारतात उत्पादन क्षमता वाढविण्याच्या तयारीत

Patil_p

प्रीपेड पाठोपाठ पोस्टपेड शुल्क वाढणार

Patil_p

मायक्रोसॉफ्टची ‘टीम्स’ची सुधारित सेवा

Omkar B

आयटी उद्योगात वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य

Patil_p

ऑटो एक्स्पो पुढील वर्षी जानेवारीत

Patil_p

पेटीएमच्या आयपीओला मंडळाची परवानगी

Amit Kulkarni
error: Content is protected !!