Tarun Bharat

गोकुळ शिरगावमधील अपघातात वृद्धाचा मृत्यू

गोकुळ शिरगाव प्रतिनिधी

पुणे बेंगलोर महामार्गावर शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना शिवाजी धोंडीराम हजारे ( वय 76 )रा. सिद्धनेर्ली तालुका कागल यांना ट्रकची धडक लागून ते जागीच ठार झाले. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

गोकुळ शिरगाव बस स्टॉप येथे कोणत्याही पादचाऱ्याने पुणे बेंगलोर महामार्ग ओलांडू नये म्हणून पोलिसांनी लोखंडी बॅरिकेट्स लावले आहेत .पण लोक या लोखंडी बॅरिकेट्स मधूनच घुसुन धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत असतात. गोकुळ शिरगाव लोकनियुक्त सरपंच एम के पाटील यांनी पादचाऱ्यांच्यासाठी निर्माण केलेला भुयारी मार्ग स्वच्छ करून गेल्या चार वर्षापासून योग्य पद्धतीने वापरण्यात येईल असा ठेवला आहे. पण तरीसुद्धा लोक या भुयारी मार्गाचा वापर न करता व आपल्या जीवाची परवा न करता असा धोकादायक रस्ता ओलांडत आहेत. त्यामुळे हा अपघाताला निमंत्रण मिळत आहे.या घटनेची फिर्याद सचिन पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सह पोलीस निरीक्षक अविनाश माने करीत आहेत.

Related Stories

युवराज संभाजीराजेंचा ‘डबल बार’ ! सर्वपक्षीयांची गरज अन् कोंडीही

Rahul Gadkar

पंढरपूर जवळील अपघातात चंदगड येथील पाच ठार तर 11 जण जखमी

Archana Banage

शिरोळ तालुक्यात पावसाची ‘ही’ आहे परिस्थिती; अनेक मार्ग बंद

Archana Banage

शिये पाच दिवस लाॅकडाऊन : संसर्ग रोखण्यासाठी निर्णय

Archana Banage

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक मे अखेर

Archana Banage

मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे – धैर्यशील माने

Archana Banage