किणये – पिरनवाडी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका वृद्धाला टँकरने जोराची धडक दिली असल्यामुळे वृद्ध जागीच ठार झाला आहे. फ्रान्सिस जॉन डिसोजा (वय 60 )राहणार भारत नगर, हुंचेनहट्टी. असे त्या दुर्दैवी इसमाचे नाव असून हा अपघात शनिवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान झाला आहे. फ्रान्सिस डिसोजा हे शनिवारी सायंकाळी पिरणवाडी येथून आपल्या घराकडे चालत जात होते. यावेळी भर धाव वेगाने जाणाऱ्या एका टँकरने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात फ्रान्सिस जागीच ठार झाले आहेत. या अपघातामुळे पिरणवाडी परिसरातील अन्य वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पिरणवाडी मुख्य रस्त्या,पाटील गल्लीच्या कॉर्नर जवळ हा अपघात झाला आहे . फ्रान्सिस यांचा मृतदेह सरकारी इस्पितळात नेण्यात आला आहे.


previous post