लाखो रुपयांचे नुकसान : आजुबाजूच्या दुकानांनाही झळ
प्रतिनिधी/ बेळगाव
ओल्ड पी. बी. रोड, जुन्या भाजी मार्केटसमोरील टायर्सच्या दुकानाला शनिवारी रात्री अचानक भीषण आग लागली. बघता बघता दुकानातील टायर्सनी पेट घेतला. आगीच्या ज्वाला वेगाने पसरल्याने बाजूला असलेल्या झाडालाही त्याची झळ बसली आणि ते झाडही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आजुबाजूच्या दोन-तीन दुकानांनाही आगीची झळ पोहोचली. या दुर्घटनेत दुकानांमधील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे.
कामत गल्ली कॉर्नरजवळील दुकानांना शनिवारी रात्री 11 च्या सुमारास आग लागली. दुर्घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्वरित अग्निशामक दलाला आणि पोलिसांना कळविण्यात आले. आगीचा बंब येईपर्यंत लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आधीच आगीने रौद्रऊप धारण केल्याने नागरिकांचे प्रयत्न कमी पडले. अग्निशामक दलाचे तीन बंब आणून पाण्याचा केला तरीसुद्धा आग आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नव्हती. लाकडाचा अ•ा, बॅटरी, टायर्सचे दुकान आणि ट्रान्सपोर्ट या दुकानांचे आगीत नुकसान झाले आहे.
रामा बापू कांबळे यांच्या दुकानाला ही आग लागली आहे. या आगीमुळे लाखोचे नुकसान झाले आहे. बाबू कांबळे व माऊती कांबळे यांच्या टायर्सच्या दुकानांनाही आग लागून नुकसान झाले आहे.