थंडीच्या दिवसात अत्यंत पौष्टिक आणि झटपट होणार पदार्थ म्हणजे अळिवाची खीर.अळीवामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न्स,व्हिटॅमिन्स, फायबर्स व्हिटॅमिन्स असतात.अळीव खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन देखील वाढते. यामुळेच वाढत्या वयातील मुलांसाठी ,महिलांसाठी,विशेष करून गरोदर महिलांसाठी अळीव खाण्याचा सल्ला दिला जातो. याआधी आपण अळीवाचे लाडू कसे बनवतात हे पाहिलंच आहे. आज आपण अळीवाची खीर बनवायची हे पाहणार आहोत.
साहित्य :
अळीव २ चमचे
दुध १/२ लिटर
साखर ३ चमचे
वेलचीपूड १/२ चमचा
जायफळ पूड १/४ चमचा
बारीक केलेले ड्रायफ्रुटस
कृती
सर्वप्रथम २ चमचे अळीव पाऊण कप पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. यानंतर एका भांड्यात दूध गरम करून थंड करून घ्या.अर्ध्या तासानंतर अळीव चांगला भिजतो.यानंतर थंड दुधात भिजवलेला अळीव घाला.आणि एकसारखं हलवून घ्या. जेणेकरून अळीवाच्या गाठी होणार नाहीत. आत्ता दूध आणि अळीवाचे मिश्रण गॅसवर ठेवा आणि एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर घाला.यांनतर त्यामध्ये वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रुटस घाला. तसेच जायफळ किसून घाला.यानंतर खीर पुन्हा एकदा उकळून घ्या.तयार झालेली झटपट आणि अत्यंत पौष्टिक असणारी खीर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.