Tarun Bharat

प्रणॉयकडून ऑलिम्पिक विजेत्या एक्सलसनला धक्का

वृत्तसंस्था/ बँकॉक

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या विश्व टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी पुरुष एकेरीच्या अ गटातील सामन्यात भारताच्या एच. एस. प्रणॉयने टॉप सीडेड आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या व्हिक्टर एक्सलसनला अनपेक्षित पराभवाचा धक्का दिला.

या स्पर्धेत अ गटातील यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांमध्ये प्रणॉयला पराभव पत्करावा लागला होता. शुक्रवारी या गटातील झालेल्या तिसऱया सामन्यात एच. एस. प्रणॉयने व्हिक्टर एक्सलसनचा 14-21, 21-17, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव केला. डेन्मार्कच्या एक्सलसनला प्रणॉयने 51 मिनिटांच्या कालावधीत पराभूत केले. प्रणॉयने एक्सलसनवर आतापर्यंत दुसऱयांदा विजय मिळविला आहे. गेल्या वषी झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयने पहिल्यांदा एक्सलसनवर मात केली होती. भारतातर्फे या स्पर्धेमध्ये पुरुष विभागात एकमेव प्रणॉयचा सहभाग होता. पण या स्पर्धेत पहिले दोन सामने गमावल्याने प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आले आहे.

Related Stories

हॉलोवेचा नवा विश्वविक्रम

Amit Kulkarni

अनिर्णित सामन्यात तामिळनाडूला तीन गुण

Patil_p

रॉब वॉल्टर, शुक्री कोनार्द दक्षिण आफ्रिकेचे नवे प्रशिक्षक

Patil_p

पुढील वर्षी भारताचा इंग्लंड दौरा

Omkar B

संयुक्त अरब अमिरातचा 7 धावांनी विजय

Amit Kulkarni

तिरंदाजीत राकेशकुमारला सुवर्णपदक

Patil_p