Tarun Bharat

ओमिक्रॉनच्या वंशावळीचा त्रास वाढतोय

लक्षण नसणे पण पॉझिटिव्ह असणे ही गंभीर बाब तर पॉझिटिव्ह असूनही रूग्ण गंभीर नसणे ही जमेची बाजू. या दोन बाजू कोविडची सद्यस्थिती स्पष्ट करत आहेत. लाट म्हणावी तर रूग्ण गंभीर नाहीत, लाट न म्हणावी तर दैनंदिन रुग्णांत प्रचंड वाढ होत आहे. या फसव्या लाटसदृश्य स्थितीवर मात करण्यास कोविड वर्तणूक फायदेशीर ठरू शकते. पहिल्या लाटेपासून सार्वजनिक आरोग्य विभाग हेच सांगत आहेत. कोरोनाचा हत्ती गेला पण व्हेरियंटचे शेपूट अद्याप वळवळत आहे. हीच वेळ सावधगिरी बाळगण्याची आहे.

लक्षण नसणे किंवा रूग्ण गंभीर स्थितीपर्यंत न जाणे यातून कोणालाही बेसावध राहून चालणारे नाही. नव्या व्हेरियंट पॉझिटिव्ह रुग्णांमुळे चिंतेत भर पडत आहे. मात्र हे रूग्ण घरच्या घरी बरें देखील होत आहेत. कोविडमध्ये सध्या आपण सर्वच विचित्र वळणावर आहोत. कोरोना गेला म्हणून मास्क नाकाखाली घेऊ शकत नाही. किंवा रूग्णसंख्या वाढते म्हणून घरी बसून चालणारेही नाही. ग्रामीण भाग  वगळल्यास सध्या शहरांत रूग्णसंख्या सतत वाढत आहे. त्यात व्हेरियंटचे निदान होत आहे. रविवारी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2087 एवढे रूग्ण आढळले. त्यामुळे मुंबईत एकूण 1093722 रुग्ण झाले. त्याचवेळी 1 रुग्णाचा मफत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मफत्यूची संख्या 19583 एवढी झाली असल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सध्या राज्यात कोरोना मफत्यूचे प्रमाण फारच कमी असल्याची दिलासादायी बाब आहे. मात्र रोज होणाऱया मफत्यू नोंदीत मुंबईतून एक तरी मफत्यू नोंदविला जातो. राज्यातील शहरांत ओमिक्रॉनच्या वंशावळीतील विषाणू संसर्ग पसरताना दिसून येत आहे. काल परवापर्यंत बीए.4 बीए.5 चे रूग्ण पुणे, मुंबईत आढळत होते. मात्र या व्हेरियंटचे रूग्ण राज्याच्या उपराजधानीत म्हणजे नागपूरातही आढळला. रविवारपर्यंत राज्यातील बीए.4 बीए.5 व्हेरियंट रूग्णसंख्या 19 एवढी होती. तसे हा व्हेरियंट जलद पसरणारा असल्याचा इशारा यापूर्वी तज्ञांनी दिला आहे. एप्रिल महिन्यातच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बोलताना लसीकरणावर जास्त भर देणार असल्याचं स्पष्ट केले होते. यावेळी सहा ते बारा वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार असे सांगण्यात आले. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानं वेगवान पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे टोपे यांनी त्यावेळी म्हटले होते. त्याचवेळी कोरोना संसर्ग वाढणार असल्याचे संकेत मिळाले होते. दरम्यान आठ एप्रिल रोजी मुंबईत 50 वर्षीय महिला एक्स ई व्हेरियंटने बाधित असल्याचे समोर आले. या व्हेरियंट वरून गोंधळ सुरु होता. त्यामुळे बंगालमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्सकडे पुढील विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. नमुन्यांच्या निष्कर्षातून तो एक्स ई व्हेरियंट असण्याची अधिक शक्यता असल्याचे पालिकेतील उच्चपदस्थ अधिकारी सांगत होते. तर राज्यात 28 मे रोजी पुण्यात बीए.4 आणि 5 हे दोन व्हेरियंट प्रथम सापडले. या व्हेरियंटचे एकूण 7 रुग्ण सापडले. यातील सर्वांना कोविडची सौम्य लक्षणे होती. कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. कोविड संसर्गात वाढ झाल्याने रुग्णालयातही दाखल होण्याचे प्रमाण थोडे वाढलेले दिसते. 24 तासांत सक्रिय रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बी ए. 4 आणि 5  ओमिक्रॉन वंशावळीतील असून त्यामुळे, विषाणू प्रसाराचा काहीसा वाढतो असे आंतरराष्ट्रीय अनुभवावरुन लक्षात आले असल्याचेही राज्याच्या आरोग्य विभागाकडून या आधीच स्पष्ट करण्यात आले होते. तसेच ते मुंबईतदेखील आढळले. तर पुढे नागपूर येथील भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे नीरीच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए.5 व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.4 आणि बीए.5 रुग्णांची संख्या आता 19 वर गेली.

या निदान झालेल्या 2 रुग्णांपैकी एक रुग्ण 29 वर्षीय पुरुष असून दुसरा रुग्ण 54 वर्षाची महिला आहे. त्यांनी मागील आठवडय़ात अनुक्रमे केरळ आणि मुंबई येथे प्रवास केला होता असे सांगण्यात आले. या दोघांचेही लसीकरण झालेले असून हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले असल्याचे सांगण्यात आले. राज्यात कोविडची चौथी लाट नसली तरी दररोजच्या रुग्णवाढीमुळे नक्कीच धोका वाढू शकतो. नवीन उपप्रकार बीए.4 आणि बीए.5 हे अचानक झालेल्या रुग्णवाढीमागे असण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. यासह, वाढलेला प्रवास, दररोजची जीवनशैली आणि कोविड वागणुकीत झालेला मोठा बदल तसेच अनेक ठिकाणी मास्कबाबतची ढिलाई यातूनही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तर, ओमिक्रॉनच्या उपप्रकाराच्या संसर्गातूनही प्रसार झालेला असू शकतो, ज्यामुळे रुग्णसंख्या वाढली असावी असेही अधिकारी सांगतात. आरोग्यय मंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबई आणि पुण्यातील आहेत. राज्यातील सक्रिय रुग्ण 4 हजारांपार गेली असून त्यातील 3 हजारांहून अधिक रुग्ण मुंबईतील असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. दरम्यान प्रत्येक रुग्णाचे जिनॉम करणे आव्हानात्मक आहे. यात टाटा एमडीची थोडी मदत होऊ शकते. टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडने (टाटा एमडी) त्यांची ओमीश्युअर आरटीपीसीआर टेस्ट अपग्रेड केली असून त्यामुळे आता या टेस्टद्वारे नवीन बीए.2 या ओमिक्रॉनच्या उपप्रकारांचा देखील तपास लावला जाऊ शकत असल्याची घोषणा केली आहे. आयसीएमआर आणि मुंबईच्या संसर्गजन्य रोगांसाठीच्या कस्तुरबा रुग्णालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेने केलेल्या एका मूल्यमापनामध्ये अपग्रेडेड ओमीश्युअरने ओमिक्रॉनचे उपप्रकार बीए.1, बीए.1.1 आणि बीए.2 यांचा यशस्वीपणे तपास लावला. यामुळे आता ओमीश्युअर आरटीपीसीआर टेस्ट किट हे सध्या देशात आढळून येत असलेल्या ओमिक्रॉनच्या सर्व उपप्रकारांचा तपास लावण्यासाठी मदतीचे ठरू शकते. मात्र राज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील कोविडचा आलेख छुपी लाट दर्शवत आहे. ओमिक्रॉनचा सौम्य प्रभाव दिसत आहे. पण, ही चौथी लाट आहे हे सांगणे आता घाईचे आहे. पण, नक्कीच कोविड रुग्णांमध्ये वाढ होतेय ही चिंतादायक बाब आहे. याचसोबत हॉस्पिटलायझेशन एवढे वाढले नसल्याने ही चांगली बाब असल्याचे डॉ. जोशी सांगतात. त्यामुळे, सहव्याधी आणि संसर्गाचा त्रास होणाऱया नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. यासह रुग्णालयात दाखल होणाऱयांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कोविड वागणूक गरजेची आहे. विशेष आणि महत्त्वाचे म्हणजे बंद वातावरणातही मास्किंग असणे गरजेचे आहे. पण, घाबरण्याची गरज नसून नागरिकांनी काळजी घ्यायलाच हवी.

राम खांदारे

Related Stories

काँग्रेसची डुबती नैय्या चिदंबरम सावरणार काय?

Patil_p

स्वयंनियंत्रणच आवश्यक

Patil_p

हे कृष्णकथा अलोलिक

Patil_p

बिट कॉईनचा ‘टॉस’ कोणाच्या पथ्यावर?

Amit Kulkarni

भ्रष्टाचाराचे लोणी अन् घोटाळय़ांची उणीदुणी

Amit Kulkarni

निद्रादेवीचं अस्तित्व

Patil_p