Tarun Bharat

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ओमप्रकाश चौटाला दोषी

Advertisements

गुरुवारी शिक्षा सुनावणार ः दिल्लीतील न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने हा निकाल दिला असून चौटाला यांच्या शिक्षेवर गुरुवार, 26 मे रोजी निर्णय होणार आहे. याप्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी निकाल राखून ठेवला होता. शनिवारी याप्रकरणी न्यायालयाने निकाल दिला. याप्रसंगी न्यायालयात माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटालाही उपस्थित होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती.

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर 86 वषीय माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जेबीटी भरती घोटाळय़ात ते गेल्यावषी 2 जुलै रोजी तिहार तुरुंगातून बाहेर आले होते. आता त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. आता पुढील आठवडय़ात होणाऱया न्यायालयाच्या संभाव्य निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील जनतेसोबतच राजकीय पक्षांचेही डोळे लागले आहेत.

26 मार्च 2010 रोजी सीबीआयने माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 1993 ते 2006 दरम्यान चौटाला यांनी 6.09 कोटी रुपयांची मालमत्ता कथितरित्या जमवली होती. ही संपत्ती त्यांच्या वैध उत्पन्नाच्या तुलनेत खूपच जास्त होती. मात्र, चौटाला कुटुंबीय नेहमीच यासंबंधीच्या आरोपांना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हणत होते.

3.68 कोटींची मालमत्ता जप्त

2019 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांची 3 कोटी 68 लाखांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये ओमप्रकाश चौटाला यांच्या मालकीचे फ्लॅट, भूखंड आणि जमिनीचा समावेश होता. जप्त केलेल्या मालमत्ता नवी दिल्ली, पंचकुला आणि सिरसा येथील आहेत. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात मनी लाँडरिंग अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली.

घोटाळय़ासंबंधी यापूर्वीही शिक्षा

आयएनएलडी सुप्रिमो चौटाला यांना जानेवारी 2013 मध्ये जेबीटी घोटाळय़ात दोषी ठरवण्यात आले होते. या भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रकरणात सात वर्षे आणि कट रचल्याबद्दल दोषी आढळल्यामुळे 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या वषीच ते दिल्लीच्या तिहार कारागृहातून शिक्षा पूर्ण करून बाहेर आले होते.

Related Stories

कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्याने घट

Patil_p

जलपाईगुडीत आदिवासी अन् मतुआ मतदार निर्णायक

Patil_p

पंचायत निवडणुकीदरम्यान युपीत 2000 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

Amit Kulkarni

तिरुपति नव्हे यद्रादि बालाजी मंदिर

Amit Kulkarni

दिल्ली-जयपूर महामार्गावर बसला आग; तिघांचा मृत्यू

datta jadhav

नौदलतळांच्या 3 किमी परिघात ड्रोनवर बंदी

datta jadhav
error: Content is protected !!