Tarun Bharat

मालवण आगाराच्यावतीने स. का. पाटील कॉलेजपर्यंत बस फेऱ्या

मालवण /प्रतिनिधी-

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे तालुक्यातून एसटी बसने प्रवास करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मालवण एसटी स्टँड येथे उतरून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी एक कि.मी. पायपीट करावी लागते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी कॉलेजच्या मागणीनुसार मालवण एसटी आगाराने सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन बस फेऱ्या थेट कॉलेजपर्यंत नेण्याची व्यवस्था केली असून आज या बसफेरीचा सर्व्हे करून शुभारंभ करण्यात आला. ही बसफेरी सोमवार ४ जुलै पासून सुरू होणार असून यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मालवण शहरासह तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गावातील विद्यार्थी हे एसटी बसने मालवणात दाखल होत असल्याने एसटी स्टँडवर उतरल्यावर त्यांना एक किलोमीटरची पायपीट करत कॉलेज गाठावे लागते. या प्रकारात कधी गाडी उशिरा आल्याने, तर कधी कोलेजपर्यंत पायी पोहचण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये वेळेत पोहचणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी मालवण आगाराकडे निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॉलेजपर्यंत बसफेरी ठेवावी अशी मागणी केली होती. यावर आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कासाल येथून सकाळी ६ वाजता सुटणारी कसाल- मालवण बसफेरी व सकाळी ६.३० वाजता देवबाग येथून सुटणारी देवबाग – मालवण या दोन बसफेऱ्या सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मालवणात दाखल होतात. या दोन्ही बस फेऱ्या मालवण एसटी स्टँड वरून थेट सिंधुदुर्ग कॉलेजपर्यंत नेण्याची सुविधा आगाराने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे कासाल – मालवण मार्गावरील गावातून येणारे विद्यार्थी, देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ या गावातून येणारे विद्यार्थी तसेच स्टँडवर पोहचलेले विद्यार्थी यांना कॉलेजपर्यंत जाण्यास सुलभ होणार आहे.

Related Stories

रत्नागिरी : टाळेबंदीमुळे स्थानिक बाजारपेठेमधील हापूसची विक्री ठप्प

Archana Banage

पार्किंग वादातून दोघांवर चाकू हल्ला

NIKHIL_N

मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांचा मृत्यू

Patil_p

तूर्तास शाळा सुरू करणे अशक्मय

NIKHIL_N

मिरकरवाडा बंदरातच नौका दुरूस्तीसाठी जागा देण्याचे आदेश

Patil_p

दुकानगाळय़ांचा प्रस्ताव अडकला वरिष्ठ कार्यालयात

Patil_p