प्रतिनिधी / पणजी
रविवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5ः30 वाजता पणजीच्या मिनेझिस ब्रागांझा सभागृहात गोमंतकीय रसिकांसाठी रंगबहार या नाटय़संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील सेवाव्रती डॉक्टर, नाटय़ अभिनेते व गोवा कला अकादमीचे प्रथम उपाध्यक्ष, डॉक्टर सावळो केणी यांच्या स्मृतीला हा कार्यक्रम अर्पण करणयात येणार आहे. पुण्याचे बालगंधर्व रसिकमंडळ व पणजीच्या स्वस्तिक कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू व केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक, तसेच डॉ. अजित शिरोडकर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या मैफलीत सुप्रसिद्ध गायिका श्रीमती बकुल पंडित, सूरगंधर्व पं. सुरेश साखवाळकर, पं. रविंद्र कुलकर्णी व सौ. अस्मिता चिंचाळकर हे कलाकार आवडती नाटय़गीते सादर करणार आहेत. त्यांना ऑर्गनची साथ राया कोरगांवकर, तबला साथ दयेष कोसंबे हे करणार आहेत. कार्यक्रम विनामुल्य असून रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. प्रवीण गावकर यांनी केले आहे.