Tarun Bharat

Solapur; मंत्री तानाजीराव सावंत यांच्या पुढाकराने ‘आदिनाथ’ पुन्हा सुरू होणार

करमाळा प्रतिनिधी

“सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजीराव सावंत हे खऱ्या अर्थाने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी तसेच करमाळा तालुक्याचे हित जोपासण्यासाठी केलेली कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक केली. यामुळे करमाळा तालुक्यातील जनता त्यांची ऋणी आहे” असे सांगत आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीने मंत्री सावंत यांचे आभार मानले आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकार तत्वावर चालवावा व बारामती ॲग्रो साखर कारखान्याने आदिनाथ कारखाना हडप करण्याचा आखलेला डाव हाणून पाडण्यासाठी आदिनाथ मंदिर संगोबा येथे सहा महिन्यापूर्वी आदिनाथ बचाव समितीची पहिली बैठक झाली होती, या बैठकीत आदिनाथ सहकार तत्वावर सुरू व्हावा यासाठी आदिनाथ महाराजांना साकडे घालण्यात आले होते.

या प्रथम बैठकीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, डॉ वसंतराव पुंडे ,धुळा कोकरे, देवानंद बागल, महेंद्र पाटील, शहाजीराव देशमुख ,अण्णासाहेब सुपनवर, देशपांडे, रवींद्र गोडगे, बाळासाहेब गायकवाड ,गौंडरे चे हनपुडे, चंद्रकांत सरडे, किरण कवडे ,संतोष पाटील, रमेश कांबळे तसेच सर्व गटातटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

धक्कादायक: एकाच दिवशी बार्शीत ३६ कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

निजामुद्दीन येथील त्या अकरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह – जिल्हाधिकारी

Archana Banage

वेमुलाचा मृत्यू मनुस्मृती मानसिकतेमुळेच

prashant_c

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Archana Banage

बंधाऱ्यावर काम करणाऱ्या मजुराची आत्महत्या

Archana Banage

रेमडेसिवीर इंजेक्शन, लस वितरणात सोलापूरवर अन्याय

Archana Banage