Tarun Bharat

खूशखबर! दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोकडून 7849 घरांची लॉटरी जाहीर

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

नवी मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडकोने दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीच्या माध्यमातून सामान्यांना नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड या नजीक सिडकोचा प्रस्तावित प्रकल्प आहे. नवी मुंबईतील बामणडोंगरी, खारकोपर या भागातील सिडकोच्या घरांचा लॉटरीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या घरांच्या लॉटरीसाठी उद्यापासून नोंदणी करता येणार आहे. सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने उभारण्यात येत असलेल्या गृहसंकुलामध्ये उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणार आहेत. गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही तीन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय, दोन लाख 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी सदनिका उपलब्ध असणार आहे.

अधिक वाचा : वर्धा-बडनेरा रेल्वेमार्गावर मालगाडीचे 20 डबे घसरले

दरम्यान, सिडकोने ऑगस्ट 2022 मध्ये काढलेल्या 4 हजार 158 घरांच्या नोंदणीसाठी 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा, खारघर नोडमध्ये ही घरे आहेत. परवडणाऱ्या दरातील या 4158 घरांपैकी 404 घरे ही पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकाकरिता आणि 3 हजार 754 घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. त्यात 245 व्यापारी गाळय़ांची लॉटरी काढण्यात आली होती.

Related Stories

कोल्हापूर खंडपीठाचा चेंडू आता मुख्यमंत्र्याच्या कोर्टात,मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कृती समितीस पत्र

Kalyani Amanagi

दुसरा व्हिडिओ बॉम्ब उद्या-परवा – चंद्रकांत पाटील

Archana Banage

कुडाळमधील मृत कोंबडय़ांचा बर्ड फ्लू अहवाल नेगिटिव्ह

Patil_p

लॉकडाऊनमुळे बाप्पाही झाले ऑनलाईन

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांसाठी इतके बेड आरक्षित

Archana Banage

पाकिस्तानचा यू-टर्न; दाऊद पाकिस्तानात नाही

datta jadhav